Hijab Controversy : चीप पब्लिसिटी; काँग्रेस नेत्याला भाजपनं सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pralhad Joshi

Hijab Controversy : चीप पब्लिसिटी; काँग्रेस नेत्याला भाजपनं सुनावलं

कर्नाटक येथील काँग्रेसचे नेते जमीर अहमद (Jamir Ahmad) यांनी दावा केला होता की भारतामध्ये बलात्कारचे प्रमाण जगभरात सर्वात जास्त आहे, याचे एकमेव कारण म्हणजे इथे मुस्लीम महिला हिजाब घालत नाही. त्यांच्या या विधानावर एकच खळबळ उडाली आणि अनेकांनी त्यांच्या या विधानावर रोष व्यक्त केला. यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी प्रतिक्रीया दिली.

प्रल्हाद जोशी म्हणाले, “पाकिस्तान मध्ये काय होत आहे, त्यांना माहिती नाही का? हे सर्व चीप पब्लिसिटीसाठी अशी प्रतिक्रीया देतात. जगात भारताचे नाव खराब करणे, त्यांचे उद्दीष्टे आहे.”

हेही वाचा: Video: राफेल विमान खरेदी वादाच्या भोवऱ्यात

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी दावा केला की,भारतात सर्वाधिक बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात कारण महिला बुरखा परीधान करत नाहीत किंवा चेहरा झाकत नाहीत. ते म्हणाले, “मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी बुरखा ही हिजाब (Hijab) मागची संकल्पना आहे. मला वाटतं जगात सर्वाधिक बलात्काराच्या घटना भारतात होतात कारण इथे स्त्रिया बुरखा परीधान करत नाहीत.”

Web Title: Bjp Answered To Congress Leaders Controversy Statement On Hijab In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top