Lok Sabha Election : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचे निधन

मुरादाबादच्या फेरनिवडणुकीवरून तर्कवितर्क
Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार सर्वेश सिंह यांचे निधन झाल्याने तेथील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, मुरादाबादमध्ये फेरनिवडणुकीची आवश्यकता आहे किंवा नाही हे ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींचा हवाला देण्यात आला आहे.

Lok Sabha Election
Jalgaon Crime News : पोलिस उकळताहेत वाळू माफियांकडून खंडण्या! एक शनिपेठचा कलेक्टर, तर दुसरा अधिकाऱ्याचा अंगरक्षक

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर मतदानाआधी एखाद्या उमेदवाराचे निधन झाल्यास तेथील निवडणूक प्रक्रिया रद्द होते आणि नव्याने मतदान घेतले जाते. परंतु, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा मृत्यू झाला तर निवडणुकीचा निकाल येईपर्यंत आयोगातर्फे प्रतिक्षा केली जाते. यात दिवंगत उमेदवार विजयी झाल्यास संबंधित मतदारसंघ रिक्त असल्याचे जाहीर करून निवडणूक आयोगाला नव्याने निवडणूक घ्यावी लागते. दिवंगत उमेदवार पराभूत झाला असल्यास आणि अन्य उमेदवार विजयी झाला असल्यास पुन्हा निवडणूक घेण्याची गरज भासत नाही.

त्यामुळे, ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर येणाऱ्या निकालाच्या आधारेच मुरादाबाद मतदारसंघातील संभाव्य फेरनिवडणुकीबद्दलचे चित्र स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया १९ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २० एप्रिलला मुरादाबादमधील भाजपचे उमेदवार सर्वेश सिंह यांचे निधन झाले होते. सर्वेश सिंह (वय ७१) हे दीर्घकाळ आजारी होते आणि दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अलिकडेच राजस्थान विधानसभा निवडणुकीत श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार गुरमीतसिंह कुन्नर यांचे निधन झाले होते. अर्थात, उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे निधन झाले असल्याने तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com