दिल्लीत भाजपचे चक्का जाम आंदोलन; महामार्गावर गाड्यांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीत भाजपचे चक्का जाम आंदोलन; महामार्गावर गाड्यांच्या रांगा

राष्ट्रीय महामार्ग २४ वर या आंदोलनामुळे लक्ष्मी नगर, दक्षिण दिल्लीत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले होते.

दिल्लीत भाजपचे चक्का जाम आंदोलन; महामार्गावर गाड्यांच्या रांगा

दिल्ली - दिल्लीत (Delhi) भाजपकडून (BJP) रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली सरकारच्या नव्या एक्साइज पॉलिसीविरोधात (New Excise Policy) हे आंदोलन सुरु आहे. केजरीवाल (Kejariwal) सरकराने दारुसंदर्भात घेतलेल्या नव्या निर्णयाविरोधात भाजपने दिल्लीत सोमवारी चक्का जाम आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग २४ (NH 24) वर या आंदोलनामुळे लक्ष्मी नगर, दक्षिण दिल्लीत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले होते. केजरीवाल सरकराने ५०० शाळांचे आश्वासन दिले, पण त्यांनी १ हजार नवे ठेके उघडले.

काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने नवीन एक्साइज पॉलिसी लागू केली. याअंतर्गत जवळपास ८९५ नव्या दारु दुकानांना परवाने मिळाले. नव्या पॉलिसीनुसार प्रत्येक प्रभागात तीन नवी दारुची दुकाने असतील. यावरून भाजप सातत्यानं केजरीवाल सरकारला घेरत आहे.

दिल्लीत प्रत्येक जिल्ह्यात भाजपने सोमवारी चक्का जाम आंदोलन पुकारलं आहे. यामुळे लक्ष्मी नगर विकास मार्ग आयटीओपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्राच्या 13 बसेस फिरल्या माघारी

भाजपचे अदेश गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना म्हटलं की, केजरीवाल सरकारचं सत्य म्हणजे त्यांनी ५०० शाळा आणि २० कॉलेज उघडण्याचं आश्वासन दिलं. पण एकही सुरु केलं नाही. मात्र दुसरीकडे ते सुरु काय करतायत? तर ८५० दारुची दुकाने अशा शब्दात त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiadelhi
loading image
go to top