Sonia Gandhi
Sonia Gandhi esakal

Sonia Gandhi: सोनिया गांधींविरुद्ध भाजपची तक्रार; निवडणूक आयोगाला दिलं निवेदन

सोनिया गांधी यांनी राज्याच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली
Published on

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राज्याच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोनिया यांनी ‘सार्वभौमत्व’ या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर केला असून यामागे देशाच्या खच्चीकरणाचा ‘टुकडे टुकडे गॅंग''चा अजेंडा आहे, असा आरोपही भाजपने केला.

हुबळी येथील सभेतील सोनिया यांच्या भाषणाचा संदर्भ देत काँग्रेसने ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, ‘कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व आणि अखंडत्वाला बाधा आणणारा कोणताही प्रयत्न काँग्रेस पक्ष हाणून पाडेल.‘ सार्वभौमत्वाच्या उल्लेखावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ, खासदार अनिल बलुनी आणि ओम पाठक यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रारीद्वारे कारवाईची मागणी केली. यावेळी यादव यांनी काँग्रेस पक्ष आणि सोनिया यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली.

Sonia Gandhi
Nana Patole : मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

काँग्रेस पक्ष असत्याच्या ठिसूळ पायावर प्रचार करत आहे. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी ज्या शब्दांचा वापर अनुचित आहे, असे शब्द काँग्रेस वापरत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केल्याचे यादव यांनी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये ज्या प्रकारे भाजपवर आरोप करण्यात आले आहे त्याकडेही निवडणूक आयोगाचे लक्ष वेधल्याचे ते म्हणाले. देशाची लोकशाही आणि ऐक्य, अखंडतेसाठी निवडणूक आयोगाकडे जी जबाबदारी आहे, त्याअंतर्गत काँग्रेसच्या देशविरोधी कारवायांबद्दल कारवाई करण्याची गरज आहे.

Sonia Gandhi
Ajit Pawar: मविआमध्ये पुन्हा तेढ; राऊतांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर!

भारतीय संघराज्य व्यवस्थेत कर्नाटक हे महत्त्वाचे राज्य आहे. असे असताना एखाद्या राज्याच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणाचे आवाहन हे फुटीरतेचे लक्षण असून याचा घातक परिणाम होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चुघ यांनी काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com