Delhi Elections : 'भाजप ५५ जागांवर जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका'

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

पहिल्या टप्प्यात आम आदमी पार्टीने आघीडी घेतली असून भाजपच्या पारड्यात १३ ते १५ जागा दिसत आहेत. तर काँग्रेस खातं उघडण्यासच असमर्थ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली. 

नवी दिल्ली : बहुचर्चित अशा दिल्ली विधानसभा निवडणूकीची मतमोजणी आज (ता. ११) सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आम आदमी पार्टीने आघीडी घेतली असून भाजपच्या पारड्यात १३ ते १५ जागा दिसत आहेत. तर काँग्रेस खातं उघडण्यासच असमर्थ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील कल हे आपच्या बाजूने आहेत असा सवाल केल्यानंतर 'मी नर्व्हस नाही, भाजपसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपच्या कार्यालयात जल्लोषाची तयारी सुरू आहे. भाजप आज दिल्ली सरकामध्ये येईल. भाजप ५५ जागांवर जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका' असे तिवारी यांनी सांगितले. तिवारी ईशान्य दिल्लीचे खासदार आहेत. 

Delhi Elections:'आप'ची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने; पक्षाचं कार्यालय सजलं, जल्लोषाची तयारी

दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघासाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले. दिल्लीत घडत असलेल्या अनेक राजकीय, सामाजिक घडामोडींमुळे या निवडणूकीत निकाल बदलतात का, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निकालाचे कौल बघता दिल्लीकरांनी पुन्हा एकदा 'आप'ला कौल दिलेला दिसतोय. मागील निवडणूकीत आपला ६७ तर भाजपला ३ जागा होत्या. यावेळी भाजपच्या जागा मोठ्या संख्येनी वाढण्याची शक्यता आहे, मात्र, बहुमतात आप येईल अशीच शक्यता पहिल्या टप्प्यात दिसत आहे. 

Delhi Elections : दिल्लीचं तख्त कोण राखणार?

सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Delhi President Manoj Tiwari speaks while counting votes at Delhi Elections