Delhi Elections : दिल्लीचं तख्त कोण राखणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मतदान झाल्यावर 24 तासांनीही निवडणूक आयोगाने नेमकी टक्केवारी जाहीर न केल्याने मतदान यंत्रांतील गडबडीच्या 'आप'च्या संशयाला बळकटी मिळाली.

दिल्ली निवडणूक 2020 : नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (ता.11) जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे.

दिल्लीतील 27 केंद्रांवर मंगळवारी (ता.11) सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होईल आणि साधारणतः साडेआठच्या सुमारास पहिला 'कल' येईल, असा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीच्या 70 जागांसाठी अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आम आदमी पक्ष व भाजप यांच्यात जोरदार लढत होत आहे. 8 फेब्रुवारीला मतदान पार पडले. यंदा 2015 पेक्षा कमी म्हणजे सुमारे 61 टक्के मतदान झाले. मुख्यमंत्री केजरीवाल यांचा चेहरा व त्यांच्या सरकारने केलेल्या विकासकामांभोवती 'आप'ने निवडणूक प्रचार केंद्रित ठेवला.

- डेव्हिड वॉर्नरला 'ऍलन बॉर्डर' तर एलिसे पेरीला 'बेलिंडा क्लार्क' पुरस्कार!

भाजप अखेरपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू शकला नाही. 'सब का साथ सबका विकास सब का विश्‍वास'ची घोषणा देणाऱ्या भाजपने 'दिल्लीचा विकास' म्हणून काय दाखवणार, या यक्षप्रश्‍नामुळे निवडणूक कठीण असल्याचे जाणवताच हिंदू-मुसलमान धार्मिक ध्रुवीकरणावर जोर दिला. 

- Oscar 2020 : ऑस्करवर 'पॅरासाईट'चे वर्चस्व; पाहा कोणाला मिळाले पुरस्कार

सीएएविरोधातील शाहीनबागेतील आंदोलन, पाकिस्तान आदी मुद्यांभोवती भाजपने अती आक्रमक प्रचार सुरू ठेवला. मात्र अखेरपर्यंत केजरीवालांविरुद्ध कोण, या प्रश्‍नाचे उत्तर भाजपने दिले नाही.

- Video : कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

मतदान झाल्यावर 24 तासांनीही निवडणूक आयोगाने नेमकी टक्केवारी जाहीर न केल्याने मतदान यंत्रांतील गडबडीच्या 'आप'च्या संशयाला बळकटी मिळाली. या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या निकालाबद्दल कमालीची उत्कंठा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP BJP or Congress who won Delhi Election 2020