भाजपमुळे गरिबांना हक्क - नरेंद्र मोदी

पीटीआय
Sunday, 24 January 2021

आसाममधील या आधीच्या सरकारांनी येथील लाखो गरीब लोकांना जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवले होते पण विद्यमान भाजप सरकार त्यांना हा हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

शिवसागर, (आसाम) - आसाममधील या आधीच्या सरकारांनी येथील लाखो गरीब लोकांना जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवले होते पण विद्यमान भाजप सरकार त्यांना हा हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं नुकसान किती? ते राज-उद्धव आणि मोदी-ममतादीदी एका स्टेजवर

पंतप्रधानांच्या हस्ते आज राज्यातील एक लाख गरीब कुटुंबांना जमिनीच्या मालकी पत्राचे वाटप करण्याच्या मोहिमेला सुरवात झाली. मोदींच्या हस्ते यावेळी ऐतिहासिक जेरेगना पठारावरील जमिनीच्या मालकीपत्राचे दहा कुटुंबांना प्रतिकात्मक वितरण देखील करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी म्हणाले, ‘सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे राज्याची धुरा आली तेव्हा सहा लाख लोकांकडे जमिनीचा अधिकृत अधिकार देखील नव्हता. आता मात्र जवळपास दोन लाख लोकांना जमिनीचा मालकी हक्क मिळाला आहे. 

आज यामध्ये आणखी एक लाखांची भर पडली आहे. याआधीच्या सरकारांनी गरीब जनतेचा कधीच विचार केला नव्हता. या मालकीपत्रांमुळे लोकांना स्वाभिमान, स्वाधीनता आणि सुरक्षा यांची हमी मिळणार आहे.

लालू प्रसाद यांच्यावर दिल्लीत ‘एम्स’मध्ये उपचार 

भाजप सरकार स्थानिकांची जमीन, भाषा आणि संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.’’  येथील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल मोदींना सोनोवाल सरकारचे कौतुक केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP gives rights poor Narendra Modi