तोंडी तलाकला आव्हान देणाऱ्या शायरा बानो यांना मंत्रिपदाचा दर्जा 

तोंडी तलाकला आव्हान देणाऱ्या शायरा बानो यांना मंत्रिपदाचा दर्जा 

डेहराडून - तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या शायरा बानो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची राज्य महिला आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपूर्वीच शायरा बानो यांनी उत्तराखंड प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तराखंड सरकारचे माध्यम समन्वयक दर्शन सिंह रावत म्हणाले, की राज्य महिला आयोगाच्या तीन उपाध्यक्षांत बानो यांचा समावेश आहे आणि त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अन्य दोन महिला रानीखेतच्या ज्योती शहा आणि चामोलीच्या पुष्पा पासवान यांचा समावेश आहे. अनेक दिवसांपासून या तिन्ही जागा रिक्त होत्या. नवरात्रोत्सवानिमित्त महिला वर्गांना दिलेली भेट आहे, अशी प्रतिक्रिया रावत यांनी दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तोंडी तलाकविरोधात बानो यांनी दीर्घकाळ लढा दिला. त्या उत्तराखंडच्या काशीपूर येथील रहिवाशी होत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाक आणि निकाह हलाला यास विरोध केला होता. तसेच मुस्लिम समाजातील बहुविवाहच्या प्रथाही चुकीची असल्याचे याचिकेत म्हटले होते. ही प्रथा बंद करावी, अशी मागणी करण्यात आली होती. बानो यांनी कुमायू विद्यापीठात समाजशास्त्र विषयात एमए पूर्ण केले. २००१ रोजी त्यांचा विवाह झाला. तेव्हा १० ऑक्टोबर २०१५ रोजी पतीने घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर त्या आता पालकांसमवेत राहतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com