
राज्यसभेत संविधानाच्या मुद्द्यावरून बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार घणाघात केला. आतापर्यंत काँग्रेसने सर्वाधिक वेळा संविधानात संशोधन करताना नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हनन केल्याचं अमित शहा म्हणाले. मुस्लिम पर्सनल लॉचा उल्लेख करत अमित शहा यांनी काँग्रेसला घेरलं. यावेळी अमित शहा यांनी युनिफॉर्म सिविल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याबाबत मोठं विधान केलं.