Video : घराबाहेर फिरत असलेल्या भाजप नेत्यावर गोळीबार! भरदिवसा तिघांनी केली हत्या

bjp leader anuj chaudhary murdered CCTV footage moradabad viral video
bjp leader anuj chaudhary murdered CCTV footage moradabad viral video

उत्तर प्रदेशात भाजप किसन मोर्चा प्रदेश कार्य समीती सदस्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युपीच्या मुरादाबाद शहरातील या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. मुरादाबाद येथील त्यांच्या घराबाहेर फिरत असताना अनुज चौधरी यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला.

मोटरसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने अनुज चौधरी रस्त्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहेत. ते रस्त्यावर पडल्यानंतर दोघे हल्लेखोर मोटरसायकलवरून खाली उतरून पुन्हा त्यांच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहेत.

bjp leader anuj chaudhary murdered CCTV footage moradabad viral video
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

अनुज चौधरी हे संभल जिल्ह्यातील रहिवासी होते. सध्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पार्श्वनाथ प्रतिभा अपार्टमेंटमधील राहत होते. 2021 मध्ये, अनुज चौधरी यांनी संभल जिल्ह्यातील असमोली ब्लॉकमधून ब्लॉक प्रमुख पदाचीो निवडणूक लढवली. यावरून अनुजचे काही लोकांशी वैर होते. अनुज लवकरच ब्लॉक प्रमुखांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार होते, पण त्याआधीच त्यांची हत्या झाली.

bjp leader anuj chaudhary murdered CCTV footage moradabad viral video
Jitendra Awhad : ठाण्यात पालिकेच्या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले! नातेवाईकांचा आक्रोश; आव्हाड आक्रमक

एसएसपी हेमराज मीणा यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर लवकरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी हत्येतील आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत अनुज चौधरीच्या कुटुंबीयांनी हत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी अनिकेत चौधरी आणि अन्य एकावर एफआयआर दाखल केला आहे. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.एसएसपी हेमराज मीणा यांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पाच टीम तयार केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com