esakal | नेताजींची जयंती 'देशप्रेम दिन' म्हणून साजरी करण्यात यावी : बोस
sakal

बोलून बातमी शोधा

Netaji-Subhaschandra-Bose

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 जयंती देशभरात साजरी केली जात आहे. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरी केली जाते.

नेताजींची जयंती 'देशप्रेम दिन' म्हणून साजरी करण्यात यावी : बोस

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी त्यांच्या मृत्यूपश्चात अनेकांनी विविध मागण्या केल्या. आताही अशाच एका देशभक्ताचा सन्मान आणि आदर वाढविण्यासाठी मागणी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिन हा 'देशप्रेम दिन' म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी नेताजींचे नातू आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकुमार बोस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

23 जानेवारीला नेताजींची जयंती असल्याने त्यापार्श्वभूमीवर चंद्रकुमार यांनी ही मागणी केली असून नेताजी प्रेमींनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

- शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा...

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना बोस म्हणाले की, 'गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. मात्र, याकडे सरकार दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, यावर्षीपासून नेताजींचा जन्मदिन देशप्रेम दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.'

- स्मारकाची उंची वाढवण्यासाठी पैसे आहेत, वाडिया रुग्णालयासाठी पैसे नाहीत का?

यावर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 जयंती देशभरात साजरी केली जात आहे. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात नेताजींची जयंती देशप्रेम दिन म्हणून साजरी करावी, अशी मागणी बोस यांनी केली आहे. 

- 'आरएनए'च्या 200 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड, न्यायासाठी राज ठाकरेंना साकडे

loading image