
अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाल्याने देगणी अभियान सुरु करण्यात आले आहे
नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाल्याने देगणी अभियान सुरु करण्यात आले आहे. राम मंदिर निर्माणासाठी देशभरातून मदत केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राम मंदिरासाठी 5 लाख रुपयांची देणगी दिली होती. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनीही मंदिराच्या उभारणासाठी मोठी देणगी दिली आहे
जुन्या 100 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? वाचा आरबीआयने काय म्हटलंय
गौतम गंभीर यांनी तब्बल 1 कोटींची मदत केली असल्याचं कळत आहे. राम मंदिराची भव्य उभारणी व्हावी अशी सर्व भारतीयांची आणि माझ्या परिवाराची इच्छा आहे. त्यामुळे माझ्याकडून हे छोटेसे योगदान, असं गंभीर म्हणाले आहेत. गंभीर यांच्यासह बॉलीवुड स्टार अक्षय कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केली आहे.
2003 ते 2016 दरम्यान गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यानंतर गंभीरने राजकीय क्षेत्राच्या खेळपट्टीवर नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी पूर्व दिल्लीकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती जिंकली. गौतम गंभीर यांनी अनेकदा समाजकार्य केले आहे.