अमित शहांच्या कोरोना टेस्ट रिपोर्टवरून गोंधळ; भाजप नेत्याने ट्विट केले डिलिट

bjp leader manoj tiwari tweet deleted about amit shah covid 19 test
bjp leader manoj tiwari tweet deleted about amit shah covid 19 test

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विटरवरून अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. मात्र, काही मिनिटांतच त्यांनी हे ट्विट डिलिट केल्यानं गोंधळ उडाला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्यावरील उपचारांना सात दिवस झाले असताना, भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी, अमित शहा यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती देणारे ट्विट केले. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेनेही त्याची दखल घेत, अमित शहांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात खुलासा केला. अमित शहा यांची पुढची कोरोना टेस्ट करण्यात आलेली नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यानंतर मनोज तिवारी यांनी आपले ट्विट डिलिट केले आहे. 

भारतातला रिकव्हरी रेट वाढला
देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सध्या भारताचा कोविड-19 रिकव्हरी रेट 68.32 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आता पर्यंत देशात 14.2 लाख लोक कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासां 48 हजार 900 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com