
Nitin Gadkari Love Story : पत्नी कांचन यांना बघायला गेले अन् पोह्यांच्याच प्रेमात पडले; वाचा गडकरींची अनोखी लव्हस्टोरी
सध्या वेलेंटाईन वीक सुरू आहे. प्रेमाचे दिवस आहे.यानिमित्त आपण काही राजकीय लोकांच्या प्रेमकहाणी जाणून घेतोय. आज आपण भाजप नेते नितिन गडकरी यांच्या अनोख्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेणार आहोत.
नितिन गडकरी हे राजकारणातील उमदं व्यक्तीमत्त्व. शब्दांपेक्षा त्यांचं काम बोलतं.एक उत्तम राजकारणी आणि दिलदार माणूस म्हणून त्यांची ओळख आहे पण तुम्हाला मात्र त्यांची लव्ह स्टोरी माहिती आहे का? नितिन गडकरी आणि त्यांची पत्नी कांचन यांची पहिली भेट कशी झाली? आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. (Bjp leader Nitin Gadkari spouse wife kanchan gadkari Love Story married life Valentine week read story)
नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांची पहिली भेट खूप मजेशीर होती. एका कार्यक्रमात नितिन गडकरी भाषण देत होते त्याच कार्यक्रमात कांचन या त्यांच्या एका पत्रकार मैत्रीणीसोबत आल्या होत्या. गडकरींनी भाषणाच्याच सुरवातीला माझ्या बंधुंनो अन् बहिनींनो अशी सुरवात केली.
त्यांच्या या वाक्यावर तेथे बसलेल्या एका मुलीने त्यांना विचारले की येथे बसणाऱ्या मुलींमध्ये तुमची भावी पत्नी असू शकते तुम्ही तर सर्वांनाच बहिण म्हणून संबोधलं तेव्हा गडकरींनी नेहमीप्रमाणे हजरजबाबीपणा दाखवत हसून म्हटले की मी तिला माझी मामे बहिण समजेल. हा योगायोग समजावा की आणखी त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कांचन या त्यांच्या पुढे पत्नी झाल्या.
कांचन गडकरी एका मुलाखतीत त्यांच्या आणि गडकरींविषयींच्या नात्याविषयी बोलताना म्हटले होते आमच लव्हमॅरेज नाही तर अरेंज मॅरेज आहे. अर्थातच गडकरी त्यांच्या सोबत कांचन यांना बघायला गेले होते.गडकरी आधीपासूनच फुडी माणूस. बघ्याच्या कार्यक्रमाला त्यांना पोहे आवडले त्यामुळे त्यांनी पुन्हा पोहे मागितले आणि वरुन दहीही मागितलं.म
मुळात गडकरींच्या आईंना नेहमी भीती असायची की गडकरी समाजसेवेत किंवा देश सेवेत आपलं आयुष्य वेचणार त्यामुळे कांचन यांना बघून आल्यावर त्यांनी थेट गडकरींना विचारलं की तू आता नक्की काय तो निर्णय घे. तब्बल एक महिन्यानंतर गडकरींनी लग्नाला होकार दिला.
गडकरींनी लग्नाच्या आधी काचंन यांना अंबाझरी पार्कला फिरायला घेऊन गेले होते पण त्यावेळी त्यांना इतके लोक भेटले की त्यांनी पुन्हा कधीच फिरायला जायचे नाही असे ठरवले.मात्र लग्न होईपर्यंत गडकरींच्या आई कांचन यांना अनेकदा सणासुदीला घरी बोलवायच्या. अखेर १८ डिसेंबर १९८४ मध्ये नितिन गडकरी आणि कांचन या लग्नबंधनात अडकले.
या ३८ वर्षाच्या संसारात कांचन या नेहमी नितिनजी सोबत राहल्या. पॉलिटिकल करिअर असो की वैयक्तिक आयुष्यातील चढउतार त्यांची साथ गडकरींना कायम होती. गडकरी हे राजकीय विश्वात रमलेले असताना कांचन यांनी संसाराचा गाडा अत्यंत कुशल रित्या चालवला.नितिन गडकरी आणि कांचन यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. या तिघांचेही लग्न झाले आहे.