Narendra Modi : पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे BJP नेत्याकडून मोदींची रावणाशी तुलना

PM Narendra Modi
PM Narendra Modisakal

नवी दिल्ली -काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रावणासारखे मोदी धार्मिक असल्याचा दावा करून करीत आहेत. (bjp leader subramanian swamy compared pm modi with ravana )

PM Narendra Modi
Uddhav Thackeray : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच उद्धव ठाकरेंचा PM मोदींना इशारा; म्हणाले...

सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी (10 डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, पंतप्रधान मोदी रावणाप्रमाणेच धार्मिक असल्याचा दावा करतात. असा दावा करून मंदिरे पाडण्याचा काम करत आहेत किंवा त्यावर ताबा मिळवत आहेत. उत्तराखंड आणि वाराणसीमध्ये हेच झालं आहे. आता मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळवून पंढरपूरच्या पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना बनवत आहे. हा नरसंहार रोखण्यासाठी आपण लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं स्वामी यांनी म्हटलं.

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपूरमध्ये अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन्ही मंदिरे तोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपचे माजी राज्यसभा खासदार नाराज असून त्यांनी कोर्टात जाण्याचा मनोदय केला आहे.

याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील गुजरातमधील प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींची रावणाशी तुलना केली होती. त्यानंतर भाजपने हा गुजरात आणि गुजराती लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं होतं. मल्लिकार्जुन खर्गे यांनी अहमदाबादच्या बेहरामपुरा येथे एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली होती.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com