

Chandranath Rath Murder
ESakal
पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेने देशाच्या राजकीय पटलावर एक काळा अध्याय जोडला गेला आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या केली. निवडणुकीचे निकाल आणि सत्तांतरानंतर दोन दिवसांनी ही घटना घडली.