

Panchayat Poll Defeat Leads to Street Light Removal in Rajasthan
Esakal
राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या निवडणुकीतले अनेक किस्सेही चर्चेत आले होते. दरम्यान, निवडणूक निकालानंतर एका नेत्यानं चक्क रस्त्यावर लावलेले स्ट्रीट लाइट काढून घेतले. यावरून आता वाद विवाद सुरू झाला आहे. भाजपचे आमदार रामसहाय वर्मा यांच्या पीएच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसला. यानंतर त्यांच्या निधीतून लावण्यात आलेल्या लाइट्स हटवण्यात आल्या. यावरून कॉकरोच जनता पार्टीने प्रश्न उपस्थित केला आहे.