भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा | UP Assembly Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

UP : भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) भारतीय जनता पक्षाला (bjp) सलग 12वा धक्का बसला आहे. शिकोहाबादचे भाजप आमदार मुकेश वर्मा (bjp mukesh verma) यांनी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान यांच्यासह इतर आमदारांप्रमाणे वर्मा यांनीही आपल्या पत्रात भाजप सरकारमध्ये दलित, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील नेत्यांकडे लक्ष दिले गेले नाही, असे लिहिले आहे. सरकारमध्ये शेतकरी, बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांची उपेक्षा झाली आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे त्यांचे नेते असल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे. (State Assembly Election 2022 UP)

काँग्रेसने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 50 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये नोएडातील पंखुरी पाठक, सलमान खुर्शीदच्या पत्नी लुईस खुर्शीद, उन्नाव येथील आशा सिंह यांचा समावेश आहे.

हेही वाचा: 48 तासांत सहा नेत्यांचा भाजपला 'राम राम', निवडणुकी आधी धक्का!

या आमदारांनी पक्ष सोडला

1. राधा कृष्ण शर्मा, बदायूं जिल्ह्यातील बिलसी येथील आमदार. 2. राकेश राठोड, सीतापूरचे आमदार. 3. माधुरी वर्मा, बहराइचमधील नानपारा येथील आमदार. 4. जय चौबे, संत कबीरनगरचे भाजप आमदार. 5. स्वामी प्रसाद मौर्य, कॅबिनेट मंत्री 6. भगवती सागर, आमदार, बिल्हौर कानपूर 7. ब्रिजेश प्रजापती, आमदार 8. रोशन लाल वर्मा, आमदार 9. विनय शाक्य, आमदार 10. अवतारसिंह भदाना, आमदार 11. दारा सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री 12. मुकेश वर्मा, आमदार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top