esakal | 'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का?'
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MP Ramesh Bidhuri asked Rahul Gandhi for Corona Test after returning from Italy

काँग्रेस खासदार राहुल गांधीही सहा दिवसांपूर्वीच इटलीहून परतले आहेत. त्यांनीही कोरोनाची चाचणी केली का असा सवाल भाजपच्या खासदाराने केला आहे. 

'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का?'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली  : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला जात आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधीही सहा दिवसांपूर्वीच इटलीहून परतले आहेत. त्यांनीही कोरोनाची चाचणी केली का असा सवाल भाजपच्या खासदाराने केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सहा दिवसांपूर्वीच राहुल गांधी इटलीहून पुन्हा भारतात आले. त्यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. पण राहुल यांनी परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? त्यांनी भारतात आल्या आल्या चाचणी करायला हवी होती, असे भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत म्हणले. इटलीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. तिथे आतापर्यंत १०० नागरिक कोरोनाने दगावले आहेत. त्यामुळे इटलीहून परत आल्यानंतर राहुल यांनी चाचणी केली का, असा सवाल बिधुरी यांनी केला. 

Coronavirus : इराणमधील भारतीय म्हणतात, 'आम्हाला वाचवा ओ'

कोरोना व्हायरस संसर्गजन्य आहे. राहुलजी नुकतेच इटलीहून परतले आहेत. त्यांनी कोरोनाची चाचणी केली की नाही मला माहीत नाही. तसेच राहुल यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी बातचीत केली. मात्र लोकांमध्ये मिसळण्यापूर्वी त्यांनी कोरोनाची चाचणी केली की नाही हे स्पष्ट करायला हवे असे बिधुरी यांनी संसदेत माध्यमांशी बोलताना सांगितले.

Coronavirus : आता 23 खासदारांना कोरोनाची लागण

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३ हजारहून जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही कोरोनाचे ३० संशयित आहेत. यातील १६ जण इटलीहून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे. 

loading image
go to top