esakal | भाजप खासदाराच्या नातीचा फटाके उडवताना भाजून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

rita bahuguna joshi

डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ती जवळपास 60 टक्क्यांपर्यंत भाजली गेली होती.

भाजप खासदाराच्या नातीचा फटाके उडवताना भाजून मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या खासदार बहुगुणा जोशी यांच्या सहा वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला आहे. जोशी यांच्या नातीचा हा मृत्यू फटाक्यांच्या भाजण्यामुळे झाला आहे. फटाके भाजल्यानंतर या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, तिचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. ती अवघ्या सहा वर्षांची होती. दिवाळीच्या दिवशी प्रयागराजमधील घरामध्ये ही घटना घडली. जखमी अवस्थेत तिला स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र नंतर तिची अवस्था आणखीनच बिघडल्यामुळे तिला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. 

हेही वाचा - कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी कलेक्टरवरच हत्येचा गुन्हा दाखल

फटाके फोडताना किया जोशी ही गंभीररित्या भाजली. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ती जवळपास 60 टक्क्यांपर्यंत भाजली गेली होती. तिच्या अशा मृत्यूमुळे खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रयागराजमधील घरासमोर जमले होते. सविस्त घटना अशी की, जोशी यांची नात किया ही प्रयागराजमधील घराच्या छतावर इतर मुलांसोबत खेळत होती. दिवाळी सणानिमित्ताने तिने नवीन फॅन्सी ड्रेसदेखील घातला होता. त्याचवेळी तिथे एका फटाक्याला लागलेली आग तिच्या ड्रेसला लागली. कपड्यांना लागलेली आग पटापट वाढत गेली. तिने मदतीसाठी आवाज दिला होता मात्र, कुणाच्याच लक्षात आलं नाही. काही वेळानंतर घरातील सदस्य जेंव्हा वर छतावर आले तेंव्हा ती जखमी आणि बेशुद्धावस्थेत त्यांना आढळली. 

हेही वाचा - स्वदेशी लस भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; 26 हजार व्हॉलेंटीअर्स होणार सहभागी
या घटनेनंतर कियाला लगेचच उपचारांसाठी एका स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ती यामध्ये 60 टक्के भाजली गेली होती. तिची अवस्था आणखीनच बिघडल्यानंतर तिला एअर एंब्युलन्सद्वारे दिल्लीमधील एम्समध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. भाजपा रिता बहुगुणा यांची ही एकुलती एक नात होती. रीता या प्रयागराजमधून भाजपच्या खासदार आहेत. त्या उत्तर प्रदेशमध्ये 2007 ते 2012 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या त्या मुलगी आहेत. त्या 2016 मध्ये भाजपमध्ये सामिल झाल्या होत्या.