esakal | स्वदेशी लस भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; 26 हजार व्हॉलेंटीअर्स होणार सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

bharat biotech

आयसीएमआरसोबत एकत्र येऊन बनवल्या जात असलेल्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आता सुरु होत आहे. 

स्वदेशी लस भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; 26 हजार व्हॉलेंटीअर्स होणार सहभागी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूचा हाहाकार पहायला मिळतो आहे. संपूर्ण जगभरात या विषाणूने धुमाकूळ घातला असून सध्या युरोपातील अनेक देशांमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही घसरती असल्याने दिलासादायक नक्कीच आहे. पण, धोका अजूनही टळलेला नाहीये. लवकरात लवकर लस आणण्यासाठी जगभरात ठिकठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. भारतातील भारत बायोटेक ही कंपनी देखील याबाबत आघाडीवर आहे. आयसीएमआरसोबत एकत्र येऊन बनवल्या जात असलेल्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आता सुरु होत आहे. 

हेही वाचा - Positive Story : पत्नी आणि मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान; दररोज हजारो लोकांचे पोट भरणारा अवलिया

भारत बायोटेकने आयसीएमआरसोबत लसनिर्मितीचे काम हाती घेतले आहे. या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी काही दिवसांपूर्वीच यशस्वीरित्या पार पडली होती. आणि आता ही लस तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी तयार आहे. याबाबतची माहिती भारत बायोटेकने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या या यशस्वरित्या कंपनीकडून पार पाडण्यात आल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी ही शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची चाचणी मानली जाते. या तिसऱ्या टप्प्यात 26 हजार व्हॉलेंटीअर्सवर चाचणी करण्यात येणार असल्याचं भारत बायोटेकने सांगितलं आहे. कंपनीने मागच्याच ऑक्टोबर महिन्यात याबाबतची परवानगी डीजीसीआयकडे मागितली होती. या ट्विटमध्ये भारत बायोटेकने म्हटलंय की, कोव्हॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होत आहे. सर्वांत मोठी कार्यक्षमता असणारी ही चाचणी 26 हजार सहभागी लोकांवर भारतामध्ये करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - 7 दिवसांचा मुख्यमंत्री, दोनवेळा राजीनामा; नितीश कुमार यांचा सातव्यांदा शपथविधी

भारत बायोटेकसोबतच काल अमेरिकेतील मॉडर्ना या फार्मा कंपनीनेही आपली लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केलाय. एक परिणामकारक आणि प्रभावी लसनिर्मितीचा हा दावा आहे. गेल्या काही दिवसांत परिणामकारक लसनिर्मितीचा असा दावा करणारी ही अमेरिकेतील दुसरी कंपनी आहे. याआधी फायझर या कंपनीने देखील आपल्या लशीच्या परिणामकारकतेबाबत वाच्यता केली होती. आपली लस 90 टक्के  प्रभावी ठरल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 

loading image