Smriti Irani Vs Rahul Gandhi : अमेठीत पुन्हा राजकारण तापणार! स्मृती इराणी अन् राहुल गांधी पुन्हा येणार आमनेसामने

Smriti Irani Vs Rahul Gandhi : हे दोघे कट्टर विरोधक एकाच वेळी अमेठीत येणार असल्याने राजकीय पारा नक्कीच वाढला आहे.
Smriti Irani Vs Rahul Gandhi
Smriti Irani Vs Rahul Gandhi

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. यादरम्यान अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी भारज जोडो न्याय यात्रा करत आहेत. त्यांची ही यात्रा अमेठी येथे येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इरानी या देखील सोमवारी चार दिवसांच्या दौऱ्यावर त्यांच्या मतदारसंघ अमोठीत असणार आहेत.

खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जवळपास दोन डझन गावांमध्ये जन संवाद यात्रा काढणार आहेत. तसेच त्या आपल्या नव्या घरात गृहप्रवेश देखील करणार आहेत. तर राहुल गांधी गौरीगंज येथून पदयात्रा करत बाबूगंज येथे एका जाहीर सभा घेणार आहेत. हे दोघे कट्टर विरोधक एकाच वेळी अमेठीत येणार असल्याने राजकीय पारा नक्कीच वाढला आहे.

अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी बऱ्याच काळानंतर अमेठीमध्ये येत असल्याने त्यांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेते युद्धपातळीवर तयारी करण्यात व्यस्त आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही सोमवारी त्यांच्या संसदीय मतदारसंघाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर अमेठी येथे येत आहेत. जिथे त्या लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जनसंवाद विकास यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून लोकांच्या समस्या ऐकून घेतील. तसेच यासोबतच सर्वसामान्यांच्या विविध समस्यांवरही त्या संवाद साधणार आहेत.

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी 22 फेब्रुवारीला खासदार स्मृती इराणी गौरीगंजच्या मेदन मवई गावातल्या त्यांच्या नवीन घरात प्रवेश देखील करणार आहेत. सुमारे 20 हजार लोकांना गृह प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रांचे वाटप करण्यात येत असून, हाऊस वॉर्मिंगच्या दिवशी मेजवानीचेही आयोजन करण्यात आले आहे.

अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अमेठीतील सर्वसामान्य जनता सहभागी होणार आहे. सध्या दोन्ही नेते अमेठीत आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीत पदयात्रा काढणार आहेत. यावेळी तब्बल 22 ठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत करण्याचे स्थानिक काँग्रेस संघटनेने ठरवले होते. राहुल गांधींच्या अमेठी येथील कार्यक्रमाबाबत सध्या काँग्रेसजनांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

Smriti Irani Vs Rahul Gandhi
Farmers Protest 2024: शेतकरी संघटनांसोबत केंद्र सरकारशी चर्चा सकारात्मक? केंद्राने दिला MSPचा प्रस्ताव, शेतकऱ्यांनी दोन दिवस थांबवला मोर्चा

सोनिया गांधींनी रायबरेली सोडल्यावर खासदार स्मृती यांनी अमेठीत घर बांधले आहे .एकीकडे अमेठीशी कौटुंबिक संबंध असलेल्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी रायबरेली पासून दूर जात आहेत, तर दुसरीकडे अमेठीच्या खासदार स्मृती इराणी अमेठीशी आपले नाते घट्ट करण्यावर भर देताना पाहायला मिळत आहे. खासदार स्मृती इराणी यांनी गौरीगंजमधील मेदन मवई गावात जवळपास 5989.50 स्क्वेअर फूट जमीन खरेदी करून घर बांधले आहे. 22 फेब्रुवारीला खासदार स्मृती इराणी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करणार आहेत. अमेठीच्या खासदार आता अमेठीत राहून लोकांच्या समस्या सोडवताना पाहायला मिळणार आहे.

Smriti Irani Vs Rahul Gandhi
Chandigarh Mayor Resign : चंदीगडच्या राजकारणात ट्विस्ट; कोर्टाच्या सुनावणीपूर्वी महापौरांचा राजीनामा तर 'आप'चे 3 नगरसेवक भाजपमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com