esakal | भाजपचं आता मिशन पश्चिम बंगाल; अशी करणार तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP to organise online rallies from June 8 In West bengal

भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. परंतु, आता त्यांचे पूर्ण लक्ष हे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगाल या राज्यावर आहे. भाजपकडून त्यासाठी मोठी व्यूव्हरचना आखण्यात येत आहे.

भाजपचं आता मिशन पश्चिम बंगाल; अशी करणार तयारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. परंतु, आता त्यांचे पूर्ण लक्ष हे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगाल या राज्यावर आहे. भाजपकडून त्यासाठी मोठी व्यूव्हरचना आखण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाच्या संकटात भाजप सरकारची वर्षपूर्ती झाली असली, तरी भाजपनं आता पश्चिम बंगालकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. व्यूव्हरचनेचा पहिला भाग म्हणून त्यांनी ऑनलाइन बैठकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बंगालमध्ये ८ जूनपासून भाजप ऑनलाइन बैठका घेणार आहे. पहिल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहेत.

ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातून पक्ष पश्चिम बंगालमधील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या बैठकांमध्ये पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह सामान्य लोकांनाही सहभागी होता येणार आहे या मीटिंगबद्दलची माहिती आणि पक्षाचा संदेश सोशल माध्यमातून दिला जाणार आहे. या बैठकीत अमित शाह हे दिल्लीतून मार्गदर्शन करणार आहेत असल्याची माहिती भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल; हा आहे नवा फॉर्म्युला :  पंतप्रधान मोदी 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये २०२१मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच कंबर कसली असून, तशी तयारी सुरू केली असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात करण्यात आलेली कामं लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम भाजपकडून केलं जाणार आहे. या अनुषंगानं भाजपनं राज्य समितीमधील उपाध्यक्ष, सचिव, महासचिव आणि मोर्चा प्रमुख आदी पदांवरील नियुक्त्याही केल्या आहेत. यात अनेक पदे पक्षातील खासदारांना आणि तृणमूल काँग्रेसमधील भाजपमध्ये प्रवेश देण्यास विरोध झालेल्या नेत्यांना देण्यात आली आहेत.

दरम्यान, २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाकडून पश्चिम बंगालमध्ये चांगलाच जोर लावला होता. पश्चिम बंगालमध्ये एकूण लोकसभेच्या ४२ जागा आहेत. त्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या पदरात १८ जागा पडल्या होत्या. आता याच जोरावर भारतीय जनता पक्ष लोकांसमोर जाऊन विधानसभेची तयारी करणार असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर २०२१च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मोठे आव्हान असणार आहे.