Assembly Election: भाजपाच्या 10 खासदारांचा राजीनामा; 3 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश, कारण...

निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी अशा 12 खासदारांनी राजीनामे सादर केले आहेत.
Assembly Election
Assembly ElectionEsakal

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज12 खासदारांनी राजीनामे सादर केले आहेत.(Latest Marathi News)

भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. तर तेलंगणात आठ जागा जिंकल्या आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ खासदारांना तिकीट दिले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी सात खासदारांनी निवडणूक लढवली. त्याचवेळी छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातील तीन खासदारांना विधानसभेची तिकिटे देण्यात आले होते.

भाजप हायकमांडने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांची भेट घेतली. त्यानंतर खासदारांनी संसद सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व सदस्य राजीनामा देण्यासाठी सभापतींना भेटायला गेले आहेत.(Latest Marathi News)

Assembly Election
Sachin and Virat Ram Mandir : राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी विराट अन् सचिन जाणार अयोध्येला?

राजस्थानमध्ये राजीनामा कोण देणार?

-राज्यवर्धन राठोड

-दिया कुमारी

- किरोरी लाल मीना (राज्यसभा सदस्य)

मध्य प्रदेशमध्ये राजीनामा कोण देणार?

- नरेंद्र तोमर

- प्रल्हाद पटेल

- राकेश सिंग

- रिती पाठक

- उदय प्रताप सिंग

Assembly Election
Senthil kumar: इंडिया आघाडी बॅकफूटवर! 'गौ-मूत्र' वक्तव्यावरुन सेंथिल कुमारांची संसदेत माफी

छत्तीसगढ़मध्ये राजीनामा कोण देणार?

- गोमती साईं

- अरुण साव

मोदी मंत्रिमंडळात तीन मंत्रीपद होणार कमी

राजीनामा देणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर यांचा समावेश आहे. त्याचवेळी छत्तीसगडच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह याही राजीनामा देणार आहेत. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळात तीन मंत्री कमी होणार आहेत. याशिवाय राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथ हेही राजीनामा देणार आहेत. राजीनामा देणाऱ्या खासदारांची संख्या 12 असल्याचे सांगण्यात येत आहे.(Latest Marathi News)

भाजपने कोणाला आणि कोठून तिकीट दिले?

- मध्य प्रदेशः नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, फग्गन सिंग कुलस्ते, राकेश सिंग, राव उदय प्रताप सिंग, रीती पाठक, गणेश सिंग यांना तिकीट देण्यात आले.

- राजस्थानः बाबा बालकनाथ, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, दिया कुमारी, नरेंद्र खिचड, राज्यवर्धन राठोड, देवजी पटेल यांना तिकीट देण्यात आले.

- छत्तीसगडः विधानसभा निवडणुकीत भाजपने खासदार विजय बघेल, गोमती साई, रेणुका सिंह, अरुण साओ यांना उमेदवारी दिली होती.

- तेलंगणा: बंदी संजय कुमार, धर्मपुरी अरविंद आणि सोयम बाबू यांना तिकीट देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com