J P Nadda : भाजप अध्यक्षांच्या पत्नीची चोरी झालेली कार अखेर 'येथे' सापडली; चोरट्यांचा नागालँडला घेऊन जाण्याचा होता प्लॅन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची पंधरवड्यापूर्वी दिल्लीतून चोरीला गेलेली मोटरकार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सापडली आहे.
BJP President  J P Nadda wife Stolen car recovered from Varanasi 2 arrested marathi news
BJP President J P Nadda wife Stolen car recovered from Varanasi 2 arrested marathi news

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची पंधरवड्यापूर्वी दिल्लीतून चोरीला गेलेली मोटरकार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सापडली आहे. ही कार नागालँडला घेऊन जाण्याची योजना होती, असे कारची चोरी केलेल्या शाहिद आणि शिवांग त्रिपाठी नावाच्या पकडण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले आहे. दोन्ही आरोपी बडकलचे रहिवासी आहेत.

दिल्लीतील गोविंदपुरी भागातून नड्डा यांच्या पत्नीच्या टोयोटा फॉर्च्युनर कारची चोरी झाली होती. आरोपींनी आधी ही गाडी त्यांच्या गावी बडकल येथे नेली. नंबर प्लेट बदलल्यानंतर ही गाडी त्यांनी अलीगड, लखीमपूर खिरी, बरेली, सीतापूर, लखनौ मार्ग वाराणसीला नेली. तेथून ही गाडी नागालॅंडला नेऊन विकली जाणार होती. केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या पत्नीच्या कारची चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी जंग पछाडले होते. सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला असता सर्वात शेवटी ही कार गुरुग्रामकडे जाताना दिसून आली होती.

BJP President  J P Nadda wife Stolen car recovered from Varanasi 2 arrested marathi news
Hemant Soren: हेमंत सोरेन यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फ्रिज, स्मार्ट टीव्हीच्या पावत्यांची एन्ट्री; ईडीची मोठी खेळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com