esakal | भाजप नेते अशोक गास्ती यांचे कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

bjp rajya sabha mp ashok gasti succumbed to coronavirus at benglore

कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक गास्ती यांचे आज (गुरुवार) बंगळुरु येथे कोरोनामुळे निधन झाले.

भाजप नेते अशोक गास्ती यांचे कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक गास्ती यांचे आज (गुरुवार) बंगळुरु येथे कोरोनामुळे निधन झाले.

'लॉकडाऊनचा देशाला नक्की काय फायदा झाला?'

अशोक गास्ती यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 सप्टेंबर रोजी बंगळुरु येथील  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. पण, उपचार सुरू असतानाच त्यांचे आज निधन झाले. अशोक गास्ती हे कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते. 22 जुलैला त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात भाजपला संघटीत बनवण्याचे श्रेय त्यांना दिले जात होते. अशोक गास्ती हे वयाच्या 18 व्या वर्षांपासून भाजपमध्ये होते. कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष होते. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ते स्वयंसेवक होते.

शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या खासदाराला कोरोनाची लागण

दरम्यान, देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून, 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 97 हजार 894 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

loading image
go to top