आता मोदींची तुलना महात्मा फुलेंशी; पात्रा म्हणतात, मोदीही समाजसुधारक!

महात्मा फुले जयंतीनिमित्त भाजपने सोमवारी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यापूर्वी दिल्ली निवडणुकीच्या काळात मोदी यांची तुलना भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केल्याने वाद उद्भवला होता.
Mahatma Phule and Narendra Modi
Mahatma Phule and Narendra ModiSakal
Summary

महात्मा फुले जयंतीनिमित्त भाजपने सोमवारी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यापूर्वी दिल्ली निवडणुकीच्या काळात मोदी यांची तुलना भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केल्याने वाद उद्भवला होता.

नवी दिल्ली - भाजपने (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना (Comparison) चक्क महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांच्याशी केली. ‘महात्मा फुले ज्याप्रमाणे समाजसुधारक (Social Reformer) होते त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांना समाज सुधारकाच्या रूपात पाहण्याची आवश्यकता आहे. ते केवळ एक राजनेते व जागतिक स्तरावरील नेते नाहीत तर ते समाज सुधारकांप्रमाणेच दिवसभर अथक परिश्रम करतात' असे पक्षप्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी सांगितले.

महात्मा फुले जयंतीनिमित्त भाजपने सोमवारी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यापूर्वी दिल्ली निवडणुकीच्या काळात मोदी यांची तुलना भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केल्याने वाद उद्भवला होता. पात्रा यांना सोमवारी मोदी यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी करण्याचा मोह आवरला नाही. मोदी हेही महात्मा फुलेंप्रमाणे अविरत काम करतात असे सांगून पात्रा म्हणाले की मागील ८ वर्षे हिंदुस्तानच्या राजकारणातील अतिशय महत्वपूर्ण व दिशानिर्धारण करणारी वर्षे ठरली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन सासत्याने असा योजना राबविल्या आहेत ज्याद्वारे महिलांचे सशक्तीकरण होऊ शकेल व मागासवर्गीय लोक पुढे जावेत. महात्मा ज्योतिबा फुले जसे समाज सुधारक आहेत तसेच मोदीही समाज सुधारकांप्रमाणे दिवसभर परिश्रम करतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.मोदींना ‘समाज सुधारक' या रूपात पाहण्याचीही आवश्यकता आहे असेही पात्रा म्हणाले.

Mahatma Phule and Narendra Modi
नवी दिल्ली : जेएनयूत झालेल्या हिंसाचारानंतर नवा विवाद

दरम्यान, सुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतिराव फुले हे सामाजिक न्यायाचे ‘चॅम्पियन' होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारतर्फेही दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले. भाजपनेही यानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित केले.

पंतप्रधानांनी अलीकडेच मार्च महिन्यातील ‘मन की बात'मध्येही महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला होता. आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले की सामाजिक न्यायाचे कैवारी आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत, म्हणून महात्मा फुले सर्वत्र आदरणीय आहेत. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले. महात्मा फुले यांची आज जयंती आहे आणि आणखी तीन दिवसांनी १४ तारखेला आपण आंबेडकर जयंती साजरी करतो. मागील महिन्यात मन की बात द्वारे त्यांना आदरांजली वाहिली होती. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.

Mahatma Phule and Narendra Modi
गोशाळेला भीषण आग; 50 गायींचा होरपळून मृत्यू, अनेक गायी जखमी

दरम्यान दिल्लीतील दोन्ही महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातही महात्मा फुले यांची साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणांतील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त राजेश अडपावार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती आदी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com