esakal | अश्विनने थेट विराटविरोधात BCCI कडे केली तक्रार? चर्चांना उधाण | Ashwin vs Virat
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwin-Virat

विराटने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्यामागे काय आहे गौडबंगाल?

अश्विनने थेट विराटविरोधात BCCI कडे केली तक्रार? चर्चांना उधाण

sakal_logo
By
विराज भागवत

नवी दिल्ली: भारतीय संघाचा नुकताच इंग्लंड दौरा पार पडला. कोरोनाचा फटका बसल्याने भारतीय संघाला हा दौरा अर्धवट सोडावा लागला. पाच पैकी चार कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ मालिकेत २-१ने आघाडीवर होता. पण चौथ्या सामन्यादरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली. तर पाचव्या सामन्याआधी सपोर्ट स्टाफमधील एकाला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे भारतीय संघाने तो दौरा अर्धवट सोडला. या दौऱ्यावर सर्वाधिक चर्चा झाली रविचंद्रन अश्विनला संघात समाविष्ट न करून घेतल्याची... विराट आणि अश्विन यांच्यात काही वाद आहे का अशाही चर्चा दरम्यानच्या काळात रंगल्या होत्या. त्यानंतर आता, अश्विनने विराटबद्दल थेट BCCI प्रशासनाकडे तक्रार केली असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

Virat-Kohli-Ravi-Shastri

Virat-Kohli-Ravi-Shastri

हेही वाचा: विराट, शास्त्री.. तुमचं गलिच्छ राजकारण थांबवा; नेटकरी संतापले

रविचंद्रन अश्विनने भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या विरोधात बंड पुकारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, त्याने विराटची तक्रार थेट BCCI ला केली होती असं एका अहवालात म्हटलं आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा विराटचा निर्णय हा अश्विनने पुकारलेल्या बंडाचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. टी२० विश्वचषकासाठी संघाची निवड झाल्यानंतर काही दिवसांतच कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्याने शारीरिक आणि मानसिक ताण असल्याचे कारण दिले. पण मूळ कारण अश्विनने पुकारलेले बंड आहे असं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: IND vs ENG : ओव्हलवर अश्विन 'अलोन'; फोटो व्हायरल

Virat-Kohli-R-Ashwin

Virat-Kohli-R-Ashwin

हेही वाचा: Breaking: विराटने सोडलं कर्णधारपद; ट्विटरवरून केली घोषणा

IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूने भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यामुळे संघातील वातावरण असुरक्षित वाटत असल्याची तक्रार BCCIचे सचिव जय शाह यांच्याकडे केली होती. मात्र, त्या खेळाडूने विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नसल्याने त्याच्याबद्दल निर्णय घेतला गेल्याचे म्हटले आहे. त्यानंतर काहींनी आपल्या माहितीमध्ये तो खेळाडू म्हणजे रविचंद्रन अश्विनच असल्याचे म्हटले होते. त्यातच अश्विनला चारही सामन्यांमध्ये संघातून बाहेर बसवण्यात आले होते. त्यामुळे हे जर खरं असेल तर ही गोष्ट खूपच गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top