esakal | भाजपच्या महिला नेत्यास अंमली पदार्थांसह अटक; कोण आहे पहा
sakal

बोलून बातमी शोधा

pamela-goswami

भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी यांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी  पोलिसांनी अटक केल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. गोस्वामी यांनी मात्र याचे खापर त्यांच्याच पक्षातील अन्य सहकाऱ्यांवर फोडले आहे.

भाजपच्या महिला नेत्यास अंमली पदार्थांसह अटक; कोण आहे पहा

sakal_logo
By
पीटीआय

कोलकता - भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी यांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी  पोलिसांनी अटक केल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. गोस्वामी यांनी मात्र याचे खापर त्यांच्याच पक्षातील अन्य सहकाऱ्यांवर फोडले आहे. राकेश सिंह यांनीच आपल्याविरोधात हे कारस्थान रचले असून त्यांची सीआयडीमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोस्वामी या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस असून त्यांना मित्र प्रदीपकुमार दुबे आणि  सुरक्षा रक्षकासह दक्षिण कोलकत्यातील न्यू अलीपूर परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून ९० ग्रँम कोकेन जप्त केले होते त्यांची किंमत काही लाखांमध्ये असल्याचे बोलले जाते. 

झूम मिटिंगमध्ये व्यस्त पतीचं पत्नीनं घेतलं चुंबन; हर्ष गोयंका, आनंद महिंद्रांनीही शेअर केला मजेशीर व्हिडिओ

गोस्वामी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, ‘याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी. भाजप नेते राकेश सिंह, कैलास विजयवर्गीय यांना अटक करण्यात यावी. माझ्याविरोधात यांनीच कारस्थान रचले आहे. राज्य पोलिस आणि तृणमूल काँग्रेस देखील यामध्ये सहभागी आहे.’

Edited By - Prashant Patil