Digvijay Singh : निवडणुकीत भाजपची ‘पीएफआय’शी युती ः दिग्विजयसिंह

दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशमधील राजगडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
Digvijay Singh
Digvijay Singhesakal

भोपाळ ः ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरील (पीएफआय) बंदीला विरोध केल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी शनिवारी फेटाळून लावला. उलट भापजपच कर्नाटकमध्ये ‘पीएफआय’च्या राजकीय विभागाशी युती करून निवडणूक लढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशमधील राजगडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) संबंधी शहा यांनी केलेल्या आरोपाचा दिग्विजयसिंह यांनी इन्कार करीत मुख्यमंत्रिपदी असताना या संघटनेवर बंदी घातली होती, अशी आठवण करून दिली. शहा यांनी खिलचीपूर येथे काल प्रचारसभेत दिग्विजयसिंह यांच्यावर आरोप केले होते. आज ‘एक्स’वर पोस्ट करीत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. शहा यांनी भाषणात माझे नाव १७ वेळा घेतले आणि आठ वेळा ते माझ्याबद्दल खोटे बोलले. मी कधीही ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला नसल्याचेही दिग्विजयसिंह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com