esakal | नवरा सफाई कामगार असलेल्या ब्लॉकच्या अध्यक्षपदी पत्नीची नेमणूक
sakal

बोलून बातमी शोधा

सोनिया

नवरा सफाई कामगार असलेल्या ब्लॉकच्या अध्यक्षपदी पत्नीची नेमणूक

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: नशीबात काय लिहून ठेवलय? हे कधीचं कोणाला ठाऊक नसतं. कल्पनाही केलेली नसते, अशी एखादी चांगली घटना आयुष्यात घडते. उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) स्थानिक पातळीवरील राजकारणात (local level politics) अशीच एक वेगळी घटना घडली. सुनील कुमार (sunil kumar) हा उत्तर प्रदेशात एका प्रभागात सफाई कर्मचारी (sweeper) म्हणून काम करतो. रोजची झाडलोट करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याने कधी कल्पनाही केली नव्हती, की ज्या प्रभागात आपण साफ-सफाईचे काम करतोय, एक दिवस आपली पत्नी त्या प्रभागाची प्रमुख होईल. पण हे वास्तवात घडलयं. (BJPs Sonia becomes chief of UP block where husband works as sweeper)

सुनील कुमारची पत्नी सोनिया भाजपाची सदस्य आहे. अलीकडेच तिने सहारनपुरमधील बलियाखेरी ब्लॉकचे प्रमुख म्हणून कामकाज सुरु केले. ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिची या पदावर वर्णी लागली. नालहीरा गुज्जर गावचा रहिवाशी असलेला सुनील बलियाखेरी प्रभागात सफाई कामगार म्हणून नोकरीला आहे.

हेही वाचा: मुंबई महापालिकेतील भाईगिरी संपणार ?

त्याने पत्नी सोनियाला वॉर्ड नंबर ५५ मधून ब्लॉक डेव्हलपमेंटच्या निवडणूक रिंगणात उतरवले. सोनियाने बीडीसीची निवडणूक जिंकली. त्यानंतर ब्लॉक प्रमुखपदाच्या निवडणुकीतही बाजी मारली. बलियाखेरी ब्लॉकचे प्रमुखपद एससीसाठी राखीव होते.

हेही वाचा: मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

भाजपा नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य मुकेश चौधरी यांनी सुशिक्षित २६ वर्षीय सोनियाला उमेदवारी दिली. या प्रवासात नवऱ्याने आणि कुटुंबाने साथ दिल्याचे सोनियाने सांगितलं. गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला.

loading image