
BMW Hits Bike in Delhi Finance Ministry Deputy Secretary Dies Wife Critical
Esakal
Car Accident Delhi: दिल्लीत छावनी मेट्रो स्थानकाजवळ बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानं अर्थ मंत्रालयात उप सचिव असलेल्या नवज्योत सिंह यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी पोलिसांनी कार चालक महिला गगनप्रीत कौर हिला अटक केलीय. अपघातात गगनप्रीत जखमी झाली होती. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी गगनप्रीतवर गुन्हा दाखल केला आहे. नवज्योत सिंग हे अर्थ मंत्रालयात उप सचिव होते. रविवारी दुपारी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला तर पत्नीला गंभीर दुखापत झालीय. अपघातावेळी नवज्योत सिंग आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून घरी परतत होते.