Assam : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली; 50 लोक करत होते प्रवास, अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmaputra River Assam

ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट बुडाल्याची बातमी समोर आली आहे.

Assam : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली; 50 लोक करत होते प्रवास, अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत (Brahmaputra River Assam) एक बोट (Boat) बुडाल्याची बातमी समोर आलीय. धुबरी जिल्ह्यात (Dhubri District) हा अपघात झाला असून बोटीत 50 लोक होते. यापैकी 20 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Chhagan Bhujbal : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, देशाविरुध्द बोललो तर ती..

आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (Assam Disaster Management Authority) सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी (CEO Gyanendra Dev Tripathi) यांनी अपघाताची माहिती दिलीय. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ही अपघातग्रस्त बोट स्वदेशी बनावटीची यांत्रिक बोट आहे. याबाबतचा अधिक तपास आसाम आपत्ती व्यवस्थापन करत आहे.

सध्या शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत धुबरीचे अधिकारीही अद्याप बेपत्ता असल्याचे उपायुक्त एम. पी. अनबामुथन यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, धुबरी जिल्ह्यातील भासानी नगर इथं असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीत आज (गुरुवार) सकाळी हा अपघात झाला. या बोटीत धुबरीचे महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह 20 हून अधिक लोक होते. बोट उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बोटीवरील सुमारे 20 जणांपैकी 10 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह 10 जण अजूनही बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणाचाही पत्ता लागलेला नाही.

हेही वाचा: Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला

टॅग्स :Aasam