esakal | 'आपले पंतप्रधान हे मुके आणि बहिरे'; अनुराग कश्यपची मोदींवर टीका!
sakal

बोलून बातमी शोधा

Kashyap-Modi

आमचे प्रधान सेवक, पंतप्रधान जनतेचे प्रधान नोकर नरेंद्र मोदी हे बहिरे, मुके आणि भावनाशून्य आहे. ते नौटंकी असून फक्त चांगले भाषण देऊ शकतात.

'आपले पंतप्रधान हे मुके आणि बहिरे'; अनुराग कश्यपची मोदींवर टीका!

sakal_logo
By
टीम ईसकाळ

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले, तर काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत समाजातील सर्वच स्तरातून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य जनता, नेते, सेलिब्रिटीही हळूहळू पुढे येत आहेत. यापैकी काहीजण मवाळ भूमिका घेत आहेत, तर काहीजण जहाल. आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. 

- शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार

वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट साकारणारा दिग्दर्शक अशी अनुराग कश्यपची ओळख आहे. तसेच तो अधूनमधून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असतो. आताही तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. 

अनुराग कश्यपने पंतप्रधानांचा मुका आणि बहिरा असा उल्लेख केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणाला की, ''आमचे प्रधान सेवक, पंतप्रधान जनतेचे प्रधान नोकर नरेंद्र मोदी हे बहिरे, मुके आणि भावनाशून्य आहे. ते नौटंकी असून फक्त चांगले भाषण देऊ शकतात. बाकी सर्व गोष्टी त्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यांना आता काही दिसत नाही, काही ऐकू येत नाही, कारण ते सध्या नव्या आणि खोट्या गोष्टी शिकण्यात व्यस्त आहेत.''   

- भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी
 
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा जे विरोध करत आहेत, ते गद्दार आहेत. संविधानासाठी लढणं, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं आणि सरकारला विरोध करणं जर गद्दारी असेल, तर मी गद्दार आहे. आणि माझी गद्दारी ही तुमच्या मोदी भक्तीपेक्षा मोठी देशभक्ती आहे, असं अनुराग कश्यपने दुसरं ट्विट केलं आहे.   

- समृद्धी महामार्ग नाही, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग 

तो तिसऱ्या ट्विटमध्ये असे म्हणतो की, जे रस्त्यावर उतरले ते देशद्रोही नाहीत, तर जे सत्तेत आहेत ते देशद्रोही आहेत. देश जनता आणि संविधानामुळे अबाधित आहे, सत्ताधाऱ्यांमुळे नाही. मोदी-शहा यांच्याआधीही देश होता आणि यापुढेही राहील. पण भाजपचा हा देशद्रोह सहन करण्यासारखा नाही. देशभक्ती ही भाजपला सिद्ध करावी लागणार आहे, आम्हाला नाही.