पत्नीला पैसे मागणे शोषण नाही; आत्महत्त्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा निर्णय

bombay
bombay

मुंबई : पत्नीकडून पैसे मागणे चूक नाहीये आणि या कृतीला IPC च्या कलम 498A नुसार त्रास देणे मानले जाऊ शकत नाही. लग्नानंतर 9 वर्षांनंतर पत्नीच्या आत्महत्त्येला जबाबदार असा आरोप असलेल्या एका व्यक्तीला निर्दोष मुक्त करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला. पती पैशांसाठी आपल्या पत्नीला मारहाण करत होता, असा आरोप या आरोपीवर होता. यावर न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी म्हटलं की पैशांची मागणी करणे अपराध नाहीये.  या दांपत्यांनी 1995 मध्येच घडस्फोट घेतला होता. मात्र, 12 नोव्हेंबर 2004 ला पत्नीने आत्महत्त्या केली होती. पीडितेच्या वडिलांनी दरभा पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. हुंडा न दिल्यामुळे मुलीला पती आणि सासरच्या मंडळींनी त्रास दिला होता, असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला  होता. 

सत्र न्यायालयाने 2 एप्रिल 2008 रोजी IPC च्या कलम 306 (आत्महत्त्येला प्रोत्साहन) आणि 498A नुसार पती प्रशांत जेरे यांना दोषी ठरवलं होतं. त्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्ष तर दुसऱ्यासाठी एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी यावर निर्णय दिला.

आरोपीच्या परिवारातील सदस्यांना न्यायालयाने मुक्त केलं होतं. न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी म्हटलं की, पीडितेच्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी चौकशी केली. कारण ही दुर्घटना घडली तेंव्हा ती तिथे उपस्थित होती. आणि आरोपी जेरेने पीडितेला मारलं होतं आणि तिला विषप्राशन करण्यासाठी भाग पाडलं होतं. मात्र, फिर्यादी पक्षाने आश्चर्यकारक पद्धतीने या प्रकरणाला आत्महत्त्या म्हणून नोंदवलं होतं. असं त्यांनी आदेशात म्हटलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com