Viral News : गुलामांचा मालक ! तरुणांनी 18 तास काम करायाचा आग्रह धरणाऱ्या सीईओने सुरू केला नवा वाद ... l bombay shaving comapany CEO shantanu Deshpande criticised youngesters for 18 hour work day advice trolled on LinkedIn | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral News : गुलामांचा मालक ! तरुणांनी 18 तास काम करायाचा आग्रह धरणाऱ्या सीईओने सुरू केला नवा वाद ...

Viral News : बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शंतनू देशपांडे यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तरुणांनी दिवसाचे १८ तास घालवले पाहिजेत, असे सांगून चांगलीच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलींगचा सामना करावा लागला.

एका टीव्ही मुलाखतीत शंतनू देशपांडे म्हणाले, "माझ्या वक्तव्याने ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्या सगळ्यांची मी माफी मागतो. तसेच मी काळाजी गरज माझ्या वक्तव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला मात्र या पोस्टमुळे ज्यांच्या मनावर आघात झाला त्यांची मी माफी मागतो"

देशपांडे यांनी त्यांच्या लेटेस्ट लींकडीन पोस्टमध्ये त्यांच्या कंपनीत सेल्स हेड या पोजिशनवर काम करणाऱ्या शँकी चौहान यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते, एका ठराविक आकड्याच्या स्टाफसोबत काम करण्यापेक्षा हार्ड वर्कींग स्टाफसोबत काम करणे कधीही चांगले. “पेपर्सवर, ते आमचे विक्री प्रमुख, कर्मचारी प्रमुख, लोक समितीचे प्रमुख आहेत. पण खऱ्या आयुष्यात ते कंपनीचा हृदयाचा ठोका आहे,” असेही त्यांनी लिहिले.

शँकी यांचे काम उत्तम दर्जाचे आहे आणि तेच मला आवडते हे इतर कर्मचाऱ्यांना कळल्यांनतर ते शँकीसारखं काम आणि वागणूक देण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा देशपांडे यांना त्यांच्या सहसंस्थापकांना शँकीसारखी गुणवत्ता असलेली माणसं त्यांच्या कंपनीसाठी शोधण्यास सांगितले. हीच त्यांच्या कंपनीसाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल असेही ते म्हणाले.

कंपनीमध्ये हार्ड वर्कीग कर्मचाऱ्यांची कॉपी करणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी शँकीसारख्या दोनच उत्तम कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे ते म्हणले.