दागिन्यांची अत्यंत आवड असणारी 'बोंडो'..एक आदिवासी जमात!

bondo.jpg
bondo.jpg

नाशिक : भारतातील आणखी एक डोंगरी आदिवासी जमात म्हणजे बोंडो. पुरुष अंगावर एखादे फडके गुंडाळतात, तर स्त्रिया आखूड झगा घालतात त्यांना दागिन्यांची अतिशय आवड असून विविध धातू व माळेच्या मण्यांनी सर्वांग मढवितात. विशेष म्हणजे स्त्रियांचे केशवपन करतात. तसेच एकमेकांपासून काहीशी दूर असलेली लाकडी घरे ते बांधतात डुकरे बांधण्याकरिता व्हरांडा व धान्य कोठाराकरिता वेगवेगळ्या जागा असतात.

 पती-पत्नीला सहजासहजी घटस्फोट मिळत नाही
विश्वकोष वेबसाईटच्या माहितीनुसार... ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात डोंगराळ भागात आढळणा त्यांची लोकसंख्या ५,३३८ होती (१९७१).पुरुषांची आणि स्त्रियांची स्वतंत्र युवागृहे प्रचारात आहेत. त्यांना अनुक्रमे इंगेरसिनी व सेलानी डिंगो म्हणतात. विवाहात वधू मूल्य असून देवर विवाह, अदलाबदल वगैरे पद्धती रुढ आहेत. बोंडो जमातीत पतीपेक्षा पत्नीचे वय जास्त असल्याची अनेक उदाहरणे आढळतात. अपहरण विवाहाची प्रथा अल्प प्रमाणात चालू आहे. या डोंगरी जमातीत पतीला अगर पत्नीला सहजासहजी घटस्फोट मिळत असला, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. गावात एका बाजूला झाडाच्या भोवती एक ओटा असून तेथे धार्मिक, सामाजिक व राजकीय कार्ये चालतात गावातील तंटे बखेडे सोडवितात. गाव बव्हंशी स्वयंपूर्ण असते. बोंडो सोपान व बदलती शेती करतात. भात हे त्यांचे प्रमुख उत्पन्न असून मासेमारी व शिकार करतात. ते दुभती जनावरे व कोंबड्या पाळतात जनावराचे दूध काढत नाहीत. सर्व प्रकारचे मांस ते खातात. 

ठडोगो" देवाला रेडा बळीची प्रथा 

कंदमुळे व फळे, बांबूच्या कांबी, भुछत्र वगैरेंचे ते संकलन करतात. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक कष्टाचे काम करतात. वांझपणा किंवा नापिकता अशुभ चिन्हे मानतात. त्याकरिता "डोगो" देवाला रेडा बळी देतात. प्रत्येक धार्मिक विधीत बळीच्या रक्तात पेरणीसाठी राखलेले बी ते भिजवतात. त्यामुळे त्याची क्षमता वाढते असे मानतात. वास्तुदेवता, जमिनीची देवता, सूर्य, पाणी, स्थानिक देवता यांचे ते पूजन करतात. मृताचे दहन करतात आणि वीरगळ उभारतात. वडाच्या झाडावर पूर्वजांची शस्त्रे ठेवतात व त्यांची वर्षातून एकदा बोंडो पूजा करतात. तांबड्या मुंग्या व उंदीर यांची त्यांना विशेष आवडही या जमातीला खास आकर्षण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com