UKच्या पंतप्रधानांनी स्वीकारलं भारताचं निमंत्रण; येत्या प्रजासत्ताक दिनी असतील प्रमुख पाहुणे

boris johnson & pm modi
boris johnson & pm modi

नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्विकारलं आहे. याआधी इंग्लडचे पंतप्रधान जॉन मेजर हे 1993 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यानंतर येणारे जॉन्सन हे दुसरे पंतप्रधान असतील. हे निमंत्रण स्विकारल्यानंतर बोरिस जॉनसन यांनी भारताला पुढील वर्षी होणाऱ्या युनायटेड किंगडमच्या G7 समिटमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.

जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हे निमंत्रण स्विकारल्याचं कळवलं आहे. तसेच त्यांनी मोदींना UKच्या G7 समिटमध्ये पाहुणे म्हणून येण्याचं निमंत्रण दिलं आहे. या समिटमध्ये दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निमंत्रण असणार आहे. समविचारी लोकशाही असणाऱ्या देशांसह हितसंबंध वाढविण्यासाठी आणि एकसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी म्हणून या समिटचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान आपल्या भारत दौर्‍याचा उपयोग ब्रिटनच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रातील सहकार्यास बळकटी आणण्यासाठी करतील. याबाबतची माहिती ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी दिली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत एका चर्चेदरम्यान जॉइंट प्रेस कॉन्फरंसमध्ये त्यांनी ही घोषणा केली. कॉन्फरंसमध्ये जयशंकर यांनी म्हटलंय की दोन्ही देशांनी वेगवेगळ्या मुद्यांवर 4 तासांची मोठी चर्चा केली. भारत आणि ब्रिटन या दोन्हीही देशांचा फोकस एकमेकांसोबतचे संबंध अधिक सुधारण्यावर आहे.

कॉन्फरंसमध्ये राब यांनी म्हटलं की ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या वर्षी ब्रिटनमध्ये होणाऱ्या G7 समिटमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिलं आहे. तसेच त्यांनी भारताचे प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देखील स्विकारले आहे. पंतप्रधान बनल्यानंतर जॉन्सन यांचा हा पहिलाच मोठा द्विपक्षीय दौरा असेल. डाऊनिंग स्ट्रीटच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षीच्या दौऱ्यासाठी भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान चर्चेमध्ये ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट, डिफेंस आणि सिक्योरीटी, हेल्थ आणि क्लायमेट चेंज हे मुद्दे असतील. जॉन्सन यांचं म्हणणं आहे की, मी पुढील वर्षी होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी खुप उत्सुक आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com