esakal | गंभीर आणि विचित्र! दीड वर्ष झालं तो टॉयलेटला गेलाच नाही; डॉक्टर चक्रावले
sakal

बोलून बातमी शोधा

madhya pradesh

मुलाला अशा प्रकारचा गंभीर आणि विचित्र आजार असल्याचं समजल्यानंतर कुटुंबियांनी मुरैना भिंडसह ग्वाल्हेरमधील अनेक डॉक्टरांना दाखवण्यात आलं.

गंभीर आणि विचित्र! दीड वर्ष झालं तो टॉयलेटला गेलाच नाही; डॉक्टर चक्रावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोपाळ - मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलाला विचित्र अशा आजाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या 18 महिन्यांपासून तो शौचालयाला गेलेला नाही. त्याचं खाणं-पिणं नेहमीसारखं असून तब्येतही ठीक आहे. सध्या त्याला काही त्रास नसला तरी त्याचे कुटुंबिय मात्र यामुळे काळजीत पडले आहेत. मुलाला कोणता गंभीर आजार होऊ नये अशीच प्रार्थना ते करत आहेत. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील हा प्रकार आहे.

मुरैना इथल्या एका गरीब कुटुंबातील मुलाला या गंभीर आणि विचित्र अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरही या प्रकारामुळे आश्चर्यचकीत झाले असून तपासणी करावी लागेल म्हणत बाजुला होत आहेत. मुरैनामध्ये राहणाऱ्या मनोज चांदिल यांचा 16 वर्षांचा मुलगा गेल्या 18 महिन्यांपासून शौचालयाला गेला नसल्याचे वृत्त आज तकने दिले आहे. 

हे वाचा - सर्वात मोठा दरोडा : फक्त दहा मिनिटांत लुटले, 11 कोटी रुपये

मुलाला अशा प्रकारचा गंभीर आणि विचित्र आजार असल्याचं समजल्यानंतर कुटुंबियांनी मुरैना भिंडसह ग्वाल्हेरमधील अनेक डॉक्टरांना दाखवण्यात आलं. आजार काय आहे याचा शोध घेण्यासाठी तपासणी करण्यात आली मात्र काही समजू शकले नाही. 

मुलगा सध्या नेहमी जितकं खातो तेवढंच खात आहे. तरीही त्याच्या पोटावर किंवा शरीराव कोणताच परिणाम दिसून येत नाही. मात्र कुटुंबाला काळजी लागली असून मुलाला काही गंभीर आजार तर झालेला नाही ना अशी भीती त्यांना वाटत आहे. याप्रकरणी बालरोग तज्ज्ञ आजाराचे निदान करण्यासाठी तपासणी करावी लागेल असं म्हणत आहेत. डॉक्टर तपासणीशिवाय काहीही बोलणं शक्य नाही असं सांगत असल्याचं कुटुंबाचे म्हणणे आहे.

loading image
go to top