esakal | मला हवे तेवढे मारा पण प्रेयसीला नका हो मारू...
sakal

बोलून बातमी शोधा

boyfriend and girlfriend beating villagers at rajasthan

प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरात गेला. दोघांना ग्रामस्थांनी पकडले आणि एका झाडाला बांधले. दोघांना मारहाण केली जात होती. यावेळी मला हवे तेवढे मारा पण प्रेयसीला नका हो मारू, एवढेच प्रियकर बोलत होता.

मला हवे तेवढे मारा पण प्रेयसीला नका हो मारू...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरात गेला. दोघांना ग्रामस्थांनी पकडले आणि एका झाडाला बांधले. दोघांना मारहाण केली जात होती. यावेळी मला हवे तेवढे मारा पण प्रेयसीला नका हो मारू, एवढेच प्रियकर बोलत होता. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गर्लफ्रेंडला 'इंप्रेस' करण्यासाठी प्रियकर बनला...

उदास नावाचा प्रियकर हा गढा गावचा रहिवासी आहे. मियासा येथे राहात असलेल्या प्रेयसीला तो भेटण्यासाठी गावात आला होता. तिच्या घरामध्ये गेल्यानंतर ग्रामस्थांनी पाहिले. दोघांना पकडून एका झाडाला दोरीने बांधले. दोघांना बांधल्यानंतर कोणी पण येऊन मारहाण करत होते. प्रियकर त्याची चूक मान्य करून प्रेयसीला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, आक्रमक झालेले ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम मारहाण सुरू ठेवली. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांची सुटका केली.

युवतीने केला चौघांसोबत विवाह अन्...

दरम्यान, याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नाही. परंतु, शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन ग्रामस्थांना अटक केली असून, पुढील चौकशी करत आहेत.

दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं अन्...