गर्लफ्रेंडला 'इंप्रेस' करण्यासाठी प्रियकर बनला...

वृत्तसंस्था
Wednesday, 29 January 2020

आयटीचे शिक्षण घेत असलेल्या युवतीला 'इंप्रेस' करण्यासाठी तो तोतया पोलिस अधिकार बनला. गुन्हेगारीच्या विविध कथा सांगून तिला फिरवत राहिला. अखेर एक दिवस तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

लखनौ (उत्तर प्रदेश): आयटीचे शिक्षण घेत असलेल्या युवतीला 'इंप्रेस' करण्यासाठी तो तोतया पोलिस अधिकार बनला. गुन्हेगारीच्या विविध कथा सांगून तिला फिरवत राहिला. अखेर एक दिवस तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

युवतीने केला चौघांसोबत विवाह अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कुमार सिंह (वय 22) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांचा गणवेश व ओळखपत्र ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची रात्र सुन्न करणारी...

अतुल कुमार सिंह याला एक युवती आवडत होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तो तोतया पोलिस अधिकारी बनला. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर तो तिला गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडी सांगून स्वतः तपास करत असल्याचे सांगायचा. शिवाय, रेल्वेतून फुकटमध्ये प्रवेश करायचा. पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेले. त्यावेळी तो प्रेयसीसोबत बसला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. परंतु, खरी माहिती समोर आली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover becomes fake police to impress girlfriend at up