युवतीने केला चौघांसोबत विवाह अन्...

वृत्तसंस्था
Wednesday, 29 January 2020

प्रथम प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि विवाह करायची. विवाह केला की हुंड्याच्या गुन्ह्यात अडकावयाची. किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्काराच्या गुन्ह्याखाली पैसे लुटायची. दोन पोलिसांनाही फसवणाऱया युवतीला विविध गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आहे.

मोगा (पंजाब): प्रथम प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि विवाह करायची. विवाह केला की हुंड्याच्या गुन्ह्यात अडकावयाची. किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्काराच्या गुन्ह्याखाली पैसे लुटायची. दोन पोलिसांनाही फसवणाऱया युवतीला विविध गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची रात्र सुन्न करणारी...

पोलिसांनी युवतीसह पाच जणांना अटक केली. तिने यापूर्वी चार विवाह केल्याचे तपासात उघड झाले आहे. चौथ्या पतीकडे तिने 10 लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, 10 लाख रुपये न देऊ शकल्यामुळे तिने बलात्काराची धमकी दिली आणि याप्रकरणात ती अडकली.

दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं अन्...

पोलिस अधिकारी गुरदेव सिंह यांनी सांगितले की, कमलजित सिंह यांनी 5 डिसेंबर 2019 रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये त्याने अमनदीप कौर नावाच्या युवतीसोबत विवाह केला होता. परंतु, तिने फसवल्याचे म्हटले होते. पहिल्या पतीपासून तिला 10 वर्षांचा मुलगा आहे. घटस्फोट न घेता तिने दुसरा विवाह केला. काही दिवसातच तिसरा विवाह केला आणि चौथाही केला. घटस्फोट, बलात्कार अशा गुन्ह्यांखाली अडकून ती पैसे लुटत होती. तिला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

शिक्षक शिकवताना विद्यार्थ्याने घेतले तिला जवळ अन्...

पोलिसांनी सांगितले की, युवती प्रथम प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. विवाहासाठी जबरदस्ती करायची किंवा बलात्काराची धमकी देऊन पैसे लुटायची. यासाठी तिला तिचे नातेवाईक मदत करायचे. दोन पोलिसांनाही तिने फसवले आहे. बदनामी पोटी अनेकजण पैसे देऊन बाहेर पडायचे. एकाकडून तिने 20 लाख रुपये लुटले आहेत. काही लाखांमध्ये पैसे घेऊन ही टोळी लुटत असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अमनदीप कौर, बबलजीत कौर, सुखपाल कौर, नरिंदर कौर, कश्मिरसिंह यांना अटक करण्यात आली आहे.

पॅंटची चेन काढली अन् महिलेला म्हणाला 'धर'...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud women arrested done four marriages without divorcing three husbands and cheated many