प्रेयसी कोणत्याही वेळी घरी यायची अन्...

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

दोघेही एकाच गावातील रहिवासी. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने विवाह केल्यानंतर प्रेयसी कोणत्याही वेळी घरी येत होती. यामुळे प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चंदीगड (पंजाब): दोघेही एकाच गावातील रहिवासी. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने विवाह केल्यानंतर प्रेयसी कोणत्याही वेळी घरी येत होती. यामुळे प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेतात पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन्...

पोलिस अधिकारी राजबचन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगमीत सिंह व मनप्रीत कौर हे एकाच गावात राहात होते. गेल्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. जगमीतचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर जमीत हा मनप्रीतला टाळत होता. परंतु, ती सोडायला तयार नव्हती. मनप्रीत ही कोणत्याही वेळी जगमीतच्या घरी येत होती. यामुळे तिच्या त्रासाला तो कंटाळला होता. शिवाय, मनप्रीतचे दुसऱाशी प्रेमसंबंध असल्याचा जगमीतला संशय होता. एक महिन्यापूर्वी गावामध्ये पंचायचीने बैठक बसवली होती. दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले होते. पुढील काही दिवस ते एकमेकांना भेटत नव्हते. पण, मनप्रीत पुन्हा भेटण्यासाठी दबाव टाकू लागली. जगमीतने प्रेयसीला फोन करून अज्ञात ठिकाणी भेटायला बोलावले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर जगमीतने मनप्रीतचा धारदार शस्त्राने खून केला. मृतदेह फेकून दिल्यानंतर कपडे जाळून टाकली.

प्रियकराला वाचवण्यासाठी कुलरमध्ये लपवले पण...

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर जगमीतला ताब्यात घेण्यात आले. त्याने खूनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 22 वर्षीय मनप्रीतने संगणक क्षेत्रात काम करत होती.

शरीराच्या 'या' भागावार 'तीळ' असेल तर तुम्ही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend kills girlfriend in punjab