शेतात पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन्...

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

शेतामध्ये कामाला जाते म्हणून सांगायची आणि प्रियकरासोबत वेळ घालवायची. शेतामध्ये दोघांना नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर घटनास्थळीच पत्नीचा खून केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सीतापूर (उत्तर प्रदेश): शेतामध्ये कामाला जाते म्हणून सांगायची आणि प्रियकरासोबत वेळ घालवायची. शेतामध्ये दोघांना नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर घटनास्थळीच पत्नीचा खून केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रियकराला वाचवण्यासाठी कुलरमध्ये लपवले पण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मझगवा येथे पत्नी संगीताचा खून केल्याप्रकरणी पती वेदनाथ याला अटक करण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पत्नीला म्हणाला, बाहेर चाललोय अन् गेला लॉजवर

वेदनाथने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, पंधरा वर्षांपूर्वी आमचा विवाह झाला होता. संगीताचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती मिळाली होती. संगीता शेतात कामाला जाते म्हणून सांगायची आणि प्रियकरासोबत वेळ घालवायची. दोंघाना रंगेहाथ पकडण्याचे ठरवले होते. संगीताने शेतामध्ये कामाला जाते म्हणून सांगितले आणि घरामधून बाहेर पडली. तिचा पाठलाग सुरू केला. शेतामध्ये गेल्यानंतर प्रियकराला भेटली. दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. रागाचा पारा चढल्यामुळे नको त्या अवस्थेतच पत्नीचा गळा कापून खून केला.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man killed his wife over illicit relationship at uttar pradesh