प्रियकराला वाचवण्यासाठी कुलरमध्ये लपवले पण...

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

प्रियकर आणि प्रेयसी घरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वस्तीवरील नागरिकांनी घराला वेढा घातला. घाबरेल्या प्रेयसीने प्रियकराला कुलरमध्ये लपवून बसवले.

कोरबा (छत्तीसगड): प्रियकर आणि प्रेयसी घरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वस्तीवरील नागरिकांनी घराला वेढा घातला. घाबरेल्या प्रेयसीने प्रियकराला कुलरमध्ये लपवून बसवले. पण, आवाज झाल्यामुळे प्रियकर सापडला गेला आणि नागरिकांनी त्याला मारहाण केल्याची घटना येथे घडली.

पत्नीला म्हणाला, बाहेर चाललोय अन् गेला लॉजवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच वस्तीवर राहणाऱया अल्पवयीन मुलगी व मुलाचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाची माहिती नागरिकांना समजली होती. घरामध्ये प्रेयसी एकटी असताना प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. घरात गेल्यानंतर दरवाजा बंद केला होता. प्रियकर घरामध्ये गेल्याचे काही व्यक्तींनी पाहिले होते. यामुळे वस्तीवरील नागरिक गोळा झाले व त्यांनी घराला वेढा घालत दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला व याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घरामधील प्रियकर व प्रेयसी घाबरून गेले. प्रेयसीने प्रियकला लपवण्यासाठी कुलर शोधला. कुलरमध्ये प्रियकराला लपवल्यानंतर तिने दरवाजा उघडला. नागरिकांनी घरात प्रवेश केल्यानंतर प्रियकराचा शोध घेऊ लागले. कुलरमध्ये आवाज झाल्यानंतर नागरिकांनी त्याला बाहेर काढले व चोप दिला.

शरीराच्या 'या' भागावार 'तीळ' असेल तर तुम्ही...

दरम्यान, प्रियकराला नागरिक मारहाण करत असताना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अल्पवयीन प्रियकराची नागरिकांच्या तावडीतून सुटका करत ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend reached girlfriend house police caught at chhattisgarh