विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

एका विवाहितेला कॉलेजमधील मित्र काही वर्षांनी भेटला. दोघांमध्ये पुन्हा प्रेमप्रकरण सुरू झाले. प्रेमात महिलेला पतीची अडचण होत असल्यामुळे दोघांनी पतीला मारण्यासाठी सुपारी दिली व पतीची हत्या घडवून आणल्याची घटना येथे घडली.

रोहतक (हरियाणा): एका विवाहितेला कॉलेजमधील मित्र काही वर्षांनी भेटला. दोघांमध्ये पुन्हा प्रेमप्रकरण सुरू झाले. प्रेमात महिलेला पतीची अडचण होत असल्यामुळे दोघांनी पतीला मारण्यासाठी सुपारी दिली व पतीची हत्या घडवून आणल्याची घटना येथे घडली.

Video: विमानतळावर महिलेसमोरच सुटला 'कंट्रोल' पण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा प्रियकर नात्याने मामा लागत आहे. कॉलेजमध्ये दोघे एकत्र शिक्षण घेत होते. शिवाय, प्रेमसंबंधही होते. परंतु, नात्याने मामा असल्यामुळे विवाह करू शकले नाहीत. महिलेचा 2006 मध्ये विवाह झाला. विवाहानंतर दोघांचे भेटणे बंद झाले होते. 2010 मध्ये पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि प्रेमसंबंध सुरू झाले. महिलेचा पती कामाला गेल्यानंतर दोघे भेटत असत. प्रेयसी पुन्हा भेटल्यामुळे युवकाने विवाह केला नव्हता. दोघांना प्रेमसंबंध सुरू ठेवण्याबरोबरच विवाह करायचा होता. परंतु, पतीचा अडसर येत होता. यामुळे दोघांनी मिळून दोन लाखांची सुपारी देवून पतीची हत्या घडवून आणली. परंतु, चौकशी दरम्यान पत्नीने प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याचे उघड झाले. दोघांसह हत्या करणाऱया अऩ्य दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Video: दारूड्याचा अर्धा तास कोब्रासोबतचा थरार पाहाच...

महिलेचा पती न्यायालयामध्ये टाईपिस्ट म्हणून कामाला होता. पतीची हत्येची सुपारी दिल्यानंतर दोन युवकांनी घरामध्ये घुसून झोपेत असतानाच दांडक्याने मारहाण करून खून केला. यानंतर महिलेने शेजारील व्यक्तींनी पतीचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. शिवाय, पोलिस घटनास्थळी उशिरा आल्याचाही आरोप केला. पोलिसांनी महिलेच्या फोनचे डिटेल्स काढल्यानंतर ती सापळ्यात आडकली आणि तिनेच प्रियकरच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले, अशी माहिती कोसली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱयांनी दिली.

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव; वृद्धही रांगेत...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife and lover arrest for husbands murder at haryana