ब्रह्मोस सूपरसोनिक मिसाईलची यशस्वी चाचणी; टार्गेटवर साधला अचूक निशाणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

भारतीय नोदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईतून ब्रह्मोस सूपरसोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- भारतीय नोदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईतून ब्रह्मोस सूपरसोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. परीक्षणादरम्यान अरबी समुद्रातील एका लक्ष्याला निशाणा बनवण्यात आले. या यशस्वी परिक्षणामुळे भारताला युद्धादरम्यान मोठी मदत मिळणार आहे. ब्रह्मोस मिसाईल दूरवरचे लक्ष्य नष्ट करु शकते. 

400 किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोसची रविवारी यशस्वी चाचणी पार पडली. मिसाईल अरबी समुद्रातील लक्ष्याला पीन-पॉईंट अॅक्युरेसीने धडकली.  डीआरडीओच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिसाईल जमीन, समुद्र आणि लढाऊ विमानातून डागली जाऊ शकते. मिसाईलचे पहिले यशस्वी परीक्षण 11 मार्च 2017 मध्ये करण्यात आले होते. 2019 मध्ये चांदीपूर स्थित आईटीआरपासून ब्रह्मोसचे जमीनी परीक्षण यशस्वी झाले होते.  

रिचा म्हणाली, माझं आयुष्यही त्या तनिष्कच्या जाहिरातीसारखं

जगातील सर्वात शक्तीशाली सूपरसोनिक क्रूज मिसाईल

डीआरडीओ आणि रशियाच्या एरोस्पेस उपक्रम एनपीओएमने संयुक्तरित्या मध्यम रेंजची सूपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाईल बनवली आहे. मिसाईल पाणडुबी, जमीन, लढाऊ विमानातून डागली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मिसाईल भारताच्या तिन्ही दलाकडे पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. ब्रह्मोसला जगातील सर्वात वेगवान सूपरसोनिक मिसाईल मानले जाते.  ब्रह्मोस रशियाच्या पी-800 क्रूज मिसाईलच्या धर्तीवर बनवण्यात आली आहे. दरम्यान, ब्रह्मोस मिसाईलचे नाव भारताच्या ब्रह्मपुत्र आणि रशियाच्या मस्कवा नदीवरुन ठेवण्यात आले आहे. या क्रूज मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा तीन पटीने अधिक आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BrahMos Supersonic Missile Successfully Test Fired From Navy Stealth Destroyer