esakal | Breakfast Updates: भाजप आमदारावर हल्ला ते संजय राऊतांचा गौप्यस्फोट; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याबद्दल नियमावली जारी करण्यात आली आहे. ​

Breakfast Updates: भाजप आमदारावर हल्ला ते संजय राऊतांचा गौप्यस्फोट; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

१)  आंदोलक शेतकऱ्यांचा भाजप आमदारावर हल्ला; अंगाला काळं फासत कपडेही फाडले

पंजाबमध्ये नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अबोहर येथील भाजपचे आमदार अरुण नारंग यांच्यावर हल्ला केला. वाचा सविस्तर

२) म्हणून अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद, संजय राऊतांचा रोखठोकमधून गौप्यस्फोट

रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर

३) पाकिस्तान, दहशतवादाचे मुद्दे गायब कसे?

सध्याच्या निवडणुकीचा विचार केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व प्रमुख सदस्य विशेषतः गृहमंत्री अमित शहा पूर्ण वेळ प्रचारात गुंतल्याचे दिसते. वाचा सविस्तर

४) शेकडो जहाज खोळंबले; चौथ्या दिवशीही सुएझची कोंडी कायम

पश्‍चिम जपानमधील कंपनीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शोई किसेन कंपनीचे अध्यक्ष युकितो हिगाकी यांनी जहाजाला बाहेर काढण्याची योजना सांगितली. वाचा सविस्तर

५) म्यानमार लष्कराच्या दडपशाहीत ९१ ठार

म्यानमारमध्ये लष्कराची दडपशाही सुरूच असून आज देशभर वार्षिक सशस्त्र सेनादल दिन साजरा केला. वाचा सविस्तर

६) ''तर मग काय होळी घरात पेटवायची?'', भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याबद्दल नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

७) पश्‍चिम बंगालमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या मोठी

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे आढळले. वाचा सविस्तर

८) मतदानापासून रोखण्यासाठी भाडोत्री गुंडांचा वापर

बंगालमध्ये मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी भाजपने भाडोत्री गुंड आणले आहेत, असा आरोप करीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. वाचा सविस्तर

९) सापाने गिळली AK 47 रायफल? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील सत्य

अजस्त्र सापाने एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला गिळल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. पण कधी सापाने बंदूक किंवा AK 47 रायफल गिळल्याचं ऐकलं आहे का? वाचा सविस्तर

१०) ग्रामीण भागातील नोंदणी कार्यालये धूलिवंदनाच्या दिवशी राहणार सुरू

राज्य सरकारने मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी घोषित केलेल्या मुद्रांक शुल्काच्या सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा. वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image