नवरी म्हणाली, आत्ताच्या आत्ता थांबवा लग्न...

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नवरा आत्ताच माझे ऐकत नसेल तर आयुष्यभर कसे होणार. मला याच्याबरोबर आयुष्य काढायचेच नाही. आत्ताच्या आत्ता थांबवा हे लग्न, असे नवरी म्हणला आणि नवऱया मुलाला मोकळ्या हाताने परतावे लागले.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश): नवरा आत्ताच माझे ऐकत नसेल तर आयुष्यभर कसे होणार. मला याच्याबरोबर आयुष्य काढायचेच नाही. आत्ताच्या आत्ता थांबवा हे लग्न, असे नवरी म्हणला आणि नवऱया मुलाला मोकळ्या हाताने परतावे लागले.

पतीच्या प्रेमाचा आता कंटाळा आलाय हो...

उत्तर प्रदेशातील एका लग्नाची गोष्टीची चर्चा चांगलीच रंगली आहे. यामागील कारण आहे, 'जुता चुराई'ची. उत्तर प्रदेशात लग्नामध्ये नवरदेवाचा बूट लपवण्याची प्रथा आहे. मात्र, या बुटामुळे लग्न मोडले असून, मोठा मारही खावा लागला.

पतीपासून आई बनू शकले नाही, मला प्रियकर हवा...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'मुझफ्फरनगरमधील सिसौली गावामध्ये लग्न मोडल्याची घटना घडली. नवरीकडील एका महिलेने विवेक कुमार (वय २२) नावाच्या नवऱ्या मुलाचे बूट लपवले होते. बूट लपवल्यानंतर वधुपक्षाकडील महिलांनी नवऱ्या मुलाकडे बुटाच्या बदल्यात पैशांची मागणी केली. यामुळे नवरा मुलगा चिडला आणि त्याने आक्षेपार्ह भाषा वापरायला सुरवात केली. शिवाय, एका व्यक्तीला मारहाणही केली. नवरीला हा हा प्रकार समजल्यानंतर तिने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवरदेव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग, नवरीही चिडली आणि त्याक्षणी लग्न मोडल्याचे जाहिर केले. वरात परत पाठवण्यात आली. पण, नवरा मुलगा, त्याचे वडील आणि दोन नातेवाईकांना वधुपक्षाने डांबून ठेवले. पोलिसांकडे प्रकरण गेल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लग्नासाठी दिलेला 10 लाखांचा हुंडा परत देण्याची तयारी दर्शवल्यानंतरच नवऱ्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना सोडण्यात आले.'

आईसाठी योग्य जोडीदार पाहिजे, पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride calls off wedding after groom abuses her relatives during juta churai