बृजभूषण सिंह म्हणाले, उत्तर भारतीयांचे कोणाशीही वैर नाही; फक्त...

Brij Bhushan Singh
Brij Bhushan SinghBrij Bhushan Singh

लखनौ : शिवसेनेचे आमदार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आपल्या नियोजित वेळेनुसार १५ जून रोजी अयोध्येत येणार आहे. यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. तसेच आज कार्यकर्ते अयोध्येसाठी रवानाही झाले आहेत. त्यांच्या दौऱ्याला कुठलाही विरोध करणार नाही. आमचा विरोध फक्त राज ठाकरे यांना असल्याचे बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आयोध्या दौऱ्याला आमचा विरोध कायम आहे. राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि अयोध्येत यावे, बस इतकीच आमची इच्छा आहे. उत्तर भारतीयांचा कोणाशीही वैर नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा आम्हाला विरोध करायचा नाही, असेही बृजभूषण सिंह म्हणाले.

Brij Bhushan Singh
भारत करतोय अण्वस्त्रांचा विस्तार; पाकिस्तान नाही मागे

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ज्या दिवशी अयोध्येत येणार आहे त्या दिवशी मी इथे नाही. मी बाहेर जात आहे. यामुळे त्यांचे स्वागत करू शकणार नाही. तसेही त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा प्रश्न नाही. कोणी विरोधही करणार नाही. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्याने त्यांच्याच दौऱ्याला आमचा विरोध आहे, असेही बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) म्हणाले.

फक्त राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याचा आम्ही विरोध करणार आहोत. त्यांनी दौरा रद्द केल्याने आमचा विरोधही नाही. ते दौऱ्याची घोषणा करतील त्यावेळी आम्हीही विरोध करायला सुरुवात करू. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध कायम राहणार आहे, असेही बृजभूषण सिंह म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com